पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/443

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचे तालुकियांत जमीदारांनी फिसाद करावी, त्यास पायबंद बसावा, याचा विचार काय तो माहितगारीने सर्व लिहिणे. तुमचे लगामी कोणकोण आहेत, तजवीज सर्व लिहिणे. जशी आज्ञा होईल तसे करणे. तुह्मी, गोपाळराव गणेश, गणेश संभाजी, गोपाळराव बापुजी एसे सारियाने फौजसुद्धा अंतर्वेदीत उतरावें. कोळेचे सुमारे सारियाने ज़मा व्हावं. आपले आपले ठाणियाचा बंदोबस्त करावा. सरकारचे फौजेची उतरावयाची तरतुद करणे ती करूं. जाणिजे. छ २० जिलकाद. + हे विनंति. २१३] ॥ श्री॥ ८ जुलै १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावा यासः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. तुह्माकडील हिशेब तिगस्तां चौसाला विल्हे लाविला त्याची नकल व गुदस्तां अजमास करून तुह्माकडे पाठविला आहे त्याची अशा दोन नकला असल अजमासाप्रमाणे व हिशेबाप्रमाणे करून सत्वर पाठवणे. अलीकडे दोन साला तुमचे महालची जमाबंदी कळत नाहीं त्यास जमा व वसूल यांचा अजमास स्थलमानेकरून पाठविणे. तुझी भेटीस याल तेव्हां समागमें कागदपत्र घेऊन यालच. परंतु अगोदर प्रयोजन कागदपत्रांचे आहे. यास्तव कासीद जोडी याच कामासाठी पाठविली आहे. याजब। सदहप्रमाणे पाठवून देणे. रवाना छ २४ जिलकाद. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२१४] ॥श्री॥ ८ जुलै १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः