पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/442

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१७ २१२] पे॥प्रथम श्रावण वद्य १३, ॥ श्री ॥ ४ जुलै १७६०. _मु॥ सेगरनदी ( १० जुलै १७६० ). राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी विनंति उपरि. पत्र आषाढ शुद्ध त्रयोदशीचे पाठविलें त्यांत मजकूर. सुज्याअतदौला जातात ; ऐकत नाही. पार फौज उतरावी. इटावियाकडून आपण येतो. आगरियाजवळ स्वामी आले, फौज उतरली ह्मणजे हे निमित्य करून फिरतील ह्मणोन व अचदालीचे लष्करची बातमी. तीर्थरूपाकडे जिन्नस रवाना केला तो सर्व कळला. ऐशियास, सुज्याअतदौला जातात. पुढे तेथे जाऊन तिकडून कांहीं पेंच पडला तर-तर कसें करितील ? हे कळत नाही. अथवा जरब मातबर आमचे तर्फेनें सारियावरी बसेल तेव्हांच नरम येतील. पुढे वर्तमान लिहीत जाणे. शाहाजादे दोहींकडे येत नाहीत असें आहे ते बरेंच आहे. तुर्त असेंच असावें. तिकडे न जावें हेच उत्तम आहे. फर्माशी जिन्नस पाठविला, उत्तम केलें. पैका पाठवावयास फार दिवस लागले. लौकर पाठवणे. पोर उतरून आपले ठाणियाचा बंदोबस्त करणे. पाऊसामुळे गंभीर नदीस पाणी, यास्तव मुकाम जाहाले. एका दो दिवशी आगरियास . जाऊं. पूल बांशेन पार फौज उतरूं. तुह्मांकडेहि फौज कांहीं पेईल. वरचेवरा गिलज्याचे लष्करचें वर्तमान लिहिणे. सुज्याअतदौला गेले. तेव्हां कोणत्या सववीवर व कोणाच्या जोरावर पैसे पाठविण्याचे लांबणीवर टाकिले ? भाऊसाहेबाचा संचार पानिपतपर्यंत अव्याहत झाला. जेथें जावें तेथें त्यांना जयच येत गेला. तेव्हां त्यांस पैशाची मदत केली असता ते फारच बालिष्ट होताल व दिल्लीस नवीन एखादें राज्य स्थापून स्वतंत्रपणे कारभार करतील असा मत्सर नानासाहेबांच्या मनांत कदाचित् आला असेल. ऐतिहासिकलेखसंग्रहांतील नंबर २५ च्या सारांशांत हा मत्सराचा विचार सखारामबापूनें नानासाहेबांच्या डोक्यांत भरवून दिला व भाऊसाहेबांना ऐवज न देण्याविषयी हिंदुस्थानांतील मामलतदारांस ताकिदी करविल्या असा मजकूर लिहिलेला आहे. ह्या ताकिदांच्या जोरावर गोविंदपंताने पैसे देण्यास विलंब लावला असावा. ह्या ताकिदी गुप्तपणे गेल्या असाव्या. २९३ गंभीर नदीच्या पार.