पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/440

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीमंत राजश्री भाऊसाहेब सिरोंजेअलीकडे आले; पुढें आगरियास आल्यावर आपण त्यांजकडे जाऊन सविस्तर निवेदन करितो. ह्मणोन कितेक विचाराचा मजकूर लिहिला तो कळला. ऐशास, प्रस्तुत चिरंजीव राजश्री भाऊ कोठपावेतों गेले ? अबदाली कोठे आहे ? नजीबखान व ज्याहानखान पुढे आले होते ते कोठे आहेत ? तें विस्तारें तिकडील वर्तमान वरच्यावर लिहीत जाणे. कनोज फफूंदच्या मुकामाची पत्रे पावली. नजीबखान, ज्याहानखान इटावियाकडे आले त्याचे वर्तमान काय ? आपले ठाणियाचें वर्तमान काय ? ते लिहिणे. जाणिजे. छ १२ जिलकाद. + हे विनंति. [२१ ] ॥ श्री॥ २७ जून १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि. स्नानाकरितां गंगादक असावें याकरितां गंगोदकाच्या कावडी २ दोन चहूं दिवसाआड वरिचेवरी पाठवीत जाणे. जाणिजे. छ १३ जिलकाद. बहुत काय लिहिणे. + सतत चांगले निगेनें कावडी येत असं तरदुदेने पाठवीत जाणे. पाणी पिणे जालें तरी त्याचा बंदोबस्त नीट करून पाठवीत जाणे. हे विनंति. चखर समक्ष हजर असलेल्या गृहस्थाने लिहिलेली नाही; ती साधीहि नाही व तीत काव्यतिहाससंग्रहांत छापलेल्या बखरींच्यापेक्षा माहितीहि जास्त नाही. सारांश, ही सर्व बखर येथून तेथून बनावट आहे. २९१ भाऊ आग्रयाला आले ह्मणजे आपण त्यांना जाऊन भेटतों ह्मणून गोविंदपंत नानासाहेबांना लिहितो; परंत, भाऊ आग्रयाला आल्यावर गोविंदपंत इटाव्यापासून कांहीं कामगिरीच्या निमित्ताने दूर निघून गेला. पानिपतच्या मोहिमेत गोविंदपंत भाऊसाहेबांना मुळीच भेटला नाही.