पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खुलासा की पठाण, रोहिले इकडे आले याजमुळे सकुराबादचा अंमल उठला; ण्याच्या विचारांत होता, इत्यादि विधाने केली आहेत; परंतु, ही विधानें खरी नाहीत हे मराठ्यांच्या इतिहासाच्या ह्या भागाच्या अवलोकनाने कळून येण्यासारखे आहे. ह्या बखरीत अशीच आणखी शेंकडों विधाने आहेत की जी खोटी आहेत असें सहज सिद्ध करून दाखविता येईल. उदाहरणार्थ कांहीं विधानांचा येथे निर्देश करितो. (१) अश्विन शुद्ध १० स भाऊंनी हिंदुस्थानच्या स्वारीचा बेत प्रगट केला असें बुंदेलखंडप्रकरणाच्या ११५ व्या पृष्ठावर आहे; परंतु, हिंदुस्थानांत जाण्याचा अश्विनांत पेशव्यांचा मुळीच बेत नव्हता हे ह्या पुस्तकांतील मागील एका टीपत सिद्ध केले आहे. (२) कार्तिक वद्य १३ स भाऊ गारपीरावर डेरेदाखल झाले असें ११७ पृष्ठांत आहे; परंतु, भाऊ दसऱ्यालाच गारपिरावर जाऊन डेरेदाखल झाले होते हे सुप्रसिद्ध आहे ( ग्रांटडफ, बखरी, इ. ). (३) भाऊ गारपिरावरून आंबेडपूर, पैठण, हरडा इत्यादि मुक्कामांवरून हिंदुस्थानांत गेले व नानासाहेव ह्यावेळी पुण्यास होते असें पृष्ठे ११९ । १२० त लिहिले आहे; परंतु, भाऊ नगर, पैठण या शहरांवरून न जातां, सिद्धटेक, पेडापूर ह्या गांवांवरून उदगिरीस गेले व उदगीरची मोहीम चालू असतां नानासाहेब अहमदनगरच्या किल्यांत बसले होते हे ह्या पुस्तकांतील मागील लेखांकांत स्पष्ट लिहिले आहे. ( ४ ) ह्या बखरकाराला उदगीरच्या मोहिमेची बातमीच नव्हती असे दिसते. कारण तिच्यासंबंधी त्याने एक शब्दहि लिहिला नाही. (५)भाऊ हिंदुस्थानांत गेल्यावर गिलज्या अटकेस आला ह्मणून हा बखरकार लिहितो; परंतु, ते अगदीच टाकाऊ आहे. (६ ) सालीमगडाजवळ मराठ्यांचे सैन्य यमुना उतरून पलीकडे गेलें असें पृष्ठ १२५ त आहे; परंतु, पानिपतच्या मोहिमेंत मराठे यमुनेचा दक्षिणतीर साडून कोठेच गेले नाहीत. आग्रा, दिल्ली, कुंजपुरा, सानपत, बागपत, पानिपत ही स्थलें यमुनेच्या ह्या तीराला आहेत. ह्या स्थलांवरून मराठे पानिपताला गेले. अबदाली कोळजळेश्वरावर यमुनेच्या तीराला होता, तो, मराठे सोनपतावर गेल्यावर, यमुना नदी उतरून ह्या तीराला आला. (७) सरदारांच्या सैन्यांचे आंकडे दिले आहेत ते फारच अवाढव्य आहेत व त्यांची बेरीजहि बराबर नाही. (८) खंडण्याचे आंकडे दिले आहेत तेहि अविश्वसनीय आहेत. भरतपूरकर, उदेपूरकर, जयनगरकर इत्यादि मोठमोठ्या संस्थानिकांकडून पावणनेऊ लक्ष रुपये खंडणी येते व बाकी फेरकोळ संस्थानिकांकडून एक्यायशी लक्ष येते! एकंदरीत ही सर्व बखर गप्पांनी भरली आहे. तारखांच्या चुका, स्थलांच्या चुका ( आंबेडपूर, कुंजरपूर ), पुरूषांच्या नांवांच्या चुका ( कुकुमशाहा, सेवाखान ), प्रसंगांच्या चुका ( उदगीरच्या लढाईची विस्मृति, अबदाली सबद एक वर्ष हिंदुस्थानांत होता ह्याची विस्मृति), काल्पनिक आंकडे, बऱ्याच तिथी देऊन आपण त्या गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या असें भासविण्याची दुरिच्छा, असा फारच वात्रटपणा ह्या बखरीत झाला आहे. रा. पारसनीस ह्मणतात त्याप्रमाणे ही