पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुरधरे व गोविंदराव चिटणीस ह्यांच्या विद्यमाने बाळाजीने कशीतरी पेशवाई मिळविली. ह्यावेळी जो त्रास झाला त्याचा सूड बाळाजीनें अंतस्थ रीतीने उगवून घेतला. इहिदे आवैन रौद्री नामसंवत्सरी झणजे इ० स० १७४० साली कोल्हापूरचे संभाजी महाराज साताऱ्यास आले असता त्यांच्याशी बाळाजी बाजीरावाने एक गुप्त करार केला. त्यांत खालील कलम आहे:-- "शाहूमहाराज यांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्कारी त्यांचे सेवक, अंतर्यामी स्वामींचे. शाहूमहाराज यांणी कैलासवास केल्यावर दोही राज्यांवर स्वामींची ( सत्ता ) आणि आमी सेवक स्वामींचे " ( काव्येतिहाससंग्रह, पत्रे, यादी वगैरे '४२८।४२९ ). ह्याप्रमाणे शाहूवर सूड उगविल्यानंतर, त्याने रघोजीचा समाचार घेतला. १७४३त रघोजीचा पराभव करून १७४४त रघोजी साताऱ्यास आला असतां शाहूकडून रघोजीला हिंदुस्थानांतील प्रांतांची वाटणी करून देवविली (भारतवर्ष, ४६।४७१४८४९). रघोजीच्या गर्वाचा परिहार केल्यावर त्याने बाबूजीनाईकावर दृष्टि फिरविली. नाईक, सोंधे विदनूर, सावनूर वगैरे संस्थानिकांच्या प्रांतांत जाऊन चौथ सरदेशमुखी गोळा करीत असे. सावनूरच्या पठाणाला व इतर संस्थानिकांना आंतून फूस देऊन नाईकाचे सर्वस्वी नुकसान का ण्याचे बाळाजीने आरंभिलें. ( का. पत्रे, यादी वगैरे ६७१६८७४।७८). बाळाजीने शाहूला, रघोजीला व बाबूजी नाईकाला हा असा त्रास दिला. शिवाय, शाहूचे कर्ज फेडण्यास बाळाजी विलंब लावू लागला. शाहूच्या राण्यांचीहि कर्जे फेडण्यास बाळाजी अळमटळम करी. तेव्हां शाहूला बाळाजीचा राग अर्थात्च आला व १७४७ त बाळाजीचा अधिकार काढून घेण्याचा त्याने विचार केला. ह्या प्रसंगाला अनुलक्षून भारतवर्षांतील नंबर ४५ चे पत्र आहे. त्यावरून बाळाजीला निरोप देण्याचा शाहूचा विचार होता है स्पष्ट होते. शाहूला ह्यावेळी बहुतेक वेड लागण्याचा समय येऊन तो पुढे दोन वर्षांनी साच्या डिसेंबराच्या १५ तारखेला मरण पावला. शाहूच्या मरणापूर्वी तीन महिने वाला साता-यास येऊन बसला होता व महाराजांच्या मरणोत्तर गादीवर कोणास बसवावें ही

  • ह्या पत्रांत भारतवर्षकार नाईक कोण ह्मणन विचारतात ते हे बाबूजीनाईक बारामती कर होत. भाऊंनी १७४६ अक्टोबरपासून १७४७ च्या मेपर्यंत सावनुरावर व वहादर भेंड्यावर स्वारी केली ( काव्येतिहाससंग्रह, पत्रे, यादी ६८). त्यावेळी ते सौंधे बिदनर प्रांताजवळ असल्या कारणाने गोवेकरांना सहजासहजी भीति वाटून सांवताकडील पोर्तुगीज लोकांचा शह चुकेल अशी बाळाजीची अटकळ होती ( पत्रे, यादी वगैरे ७७७८ ). सावनूरचा नवाब सोंध्याकडे आला ह्मणजे सदाशिवरावभाऊला शह बसून गोवेकरांचा शह उडून जाईल असे बाळाजीचे ह्मणणे होते. ह्यासंबंधी बोलणे करीत बाळाजी साताऱ्यास असतांना हे पत्र लिहिले आहे. शाहूने बाळाजीची स्वामिभक्ति पहाण्याच्या इच्छेने त्याला निरोप देण्याचे ह्मणजे काढून टाकण्याचे ढोंग केलें ह्मणून शाहूमहाराजांच्या बखरीत लिहिले आहे. परंतु, शाहूचे हे ढोंग नसून मनःपूर्वक करणे होते हे स्पष्ट आहे.