पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलमें ३।४।८।११). हे इतकें महाराष्ट्रधर्माचा प्रसार व ब्राह्मणपदबादशाहीची प्रस्तावना व विस्तार करण्याकरितां मराठ्यांनी काय काय खटपटी केल्या तत्संबंधीं झालें. आत पुढील विवेचनांत सातारच्या छत्रपतींची व्यवस्था करण्यांत पेशव्यांचे काय धोरण होते, त्याचा विचार करितो. विवेचन चवथे. । महाराष्ट्रधर्माचा ह्मणजे संस्थांचा प्रसार व ब्राह्मणपदवादशाहीची स्थापना करणे हे बाळाजीच्या राजनीतीचे सर्वस्व होतें. ह्या मतलबाच्या सिद्धयर्थ महाराष्ट्रांत व महाराष्ट्राच्या बाहेर त्याचे प्रयत्न चालले होते. पैकी महाराष्ट्राच्या बाहेर त्याने काय खटपटी केल्यां त्याचे दिग्दर्शन वरील विवेचनांत केले आहे. आतां खुद्द महाराष्ट्रांत त्याने काय खटपट केली ते सांगतो. बाळाजी विश्वनाथापासून बाळाजी बाजीरावासुद्धा सर्व पेशव्यांचा मुख्य हेतु स्वतःचे महत्त्व सर्वांहून अधिक वाढविण्याचा होता. धनाजी जाधवाच्या मृत्यूनंतर चंद्रसेन जाधव शाहूचा सेनापति झाला. त्याला बाळाजी विश्वनाथाने प्रथम पिटून लाविले. नंतर त्याने बहिरोपंत पिंगळ्याला एकीकडे मारिलें व आपण मुख्य प्रधानकीचा अधिकार ह्मणजे मराठ्यांचे धुरीणत्व मिळविले. बाजीरावाचे मुख्य प्रतिस्पर्धी ह्मटले ह्मणजे श्रीपतराव प्रतिनिधि, त्रिंबकराव दाभाडे व रघोजा भोसले हे होत. ह्यांपैकी पहिल्या दोघांचे महत्त्व १७६१ च्या आत त्याने पूर्णपणे नाहींसें केलें व पुढील ९ वर्षे मराठ्यांचें धुरीणत्व अनन्यसामान्यत्वेकरून चालदिले. रघोजीचे प्रस्थ काही राहिले होतें ते बाळाजी बाजीरावाने १६ जानेवारी १७४४ त मोडून त्याला आपला स्नेही केले. शाहूच्या मृत्यूनंतर १७५० साली बाळाजीचे लहान सहान प्रतिस्पर्धीहि वर डोके करूं लागले व कांहों वेळ त्याचे स्नेही सुद्धा त्याच्याविरूद्ध उठले. ताराबाई, जगजीवनराव प्रतिनिधी, यमाजी शिवदेव, बाबूराव बारामतीकर, दमाजी गायकवाड व दाभाडे यांना जागच्याजागी बसविण्यांत वाळाजीला १७५० पासून १७५३ पर्यंत खटपट करावी लागली. ह्या अवधीत सदाशिव चिमणाजी व रामचंद्रबाबा शेणवई ह्यांना देखील प्रतिस्पर्धेच्या पिशाचिकेनें सोडिले नाही. खुद्द रामराजाहि बाळाजीविषयी उदासीन राहूं लागला. तेव्हां पहिल्या दोघांना मायावीपणाने फितवून बाळाजीनें रामराजावर आपला सर्व राग काढिला. सातारच्या छत्रपतींविषयी बाळाजी बाजीरावाच्या मनांत फारशी प्रेमबुद्धि कधीच नव्हती. खुद्द शाहूमहाराजांशीहि बाळाजी बाजीरावाचे वर्तन धरसोडीचेंच होते. परंतु बाळाजी बाजीरावाने ह धरसोडांचे वर्तन प्रथम घालून दिलें असें मात्र कोणी • समजू नये. १७४०त चिमाजीआप्पा कोंकणांत असतां कांहीं राऊत गोवळकोंड्याकडे पाठ वून द्यावें ह्मणून शाहूनें चिमाजीला लिहिले. तें चिमाजीला मान्य न होऊन चिमाजीचा व शाहूचा बराच खटका उडाला ( भारतवर्ष पत्रे व यादी ३८). बाळाजीरावाने पेशवाईची वस्त्रे १७४० घेतली. ती त्याला महत्प्रयासाने प्राप्त झाली. कांकी रघोजी भोसल्याने बाबूजीनाईक बारामतीकराला पेशवाई देवावण्याचा घाट घातला होता. परंतु महादोबा