पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खटपटींत निमग्न होता. सातारच्या गादीला त्यावेळी हक्क सांगणारे दोन पुरुष होते. ( १) पहिला हक्कदार ताराबाईचा नातू रामराजा व ( २ ) दुसरा, कोल्हापुरचा संभाजी राजा. पैकी संभाजी राजाकड बाळाजीचा १७४० पासून ओढा होता हे वर सांगितलेच आहे. परंतु, तो शाहूमहाराजांना पसंत नव्हता. राजाराम महाराजांचा वडील पुत्र जो शिवाजी त्याचा मुलगा रामराजा हयात आहे असें शाहूला नुकतेच कळले होते. तेव्हां त्याला दत्तक घेऊन राज्य चालवावें असें शाहूचें साग्रह व सशास्त्र मणणे पडले. त्यावेळी बाळाजीला शाहूनें एक चिट्टी लिहिली आहे ती खाली देतो. राजमान्य राजश्री बाळाजी प्रधान पंडित यांस आज्ञा: तुह्मी फौज धरनें. आज्ञा केली त्याच्या दैवी नाही. महाराजास दुखने झाले. नाहीं; बरे होत नाही. राज्यभार चालला पाहिजे. तरी पुढे वंश* बसवन. कोल्हापुरचें न करनें. चिटणिसास सर्व सांगितले तस करने. वंस होईल त्याच्या आज्ञेत चालनें. राजमंडळ चालवनें. चिटणीस स्वामीचे इसवासू . त्याच्या विचारें राज्य राखनें. वंस होईल तो तु (ह्मास * अंतर ) करनार नाही. सुदन असा. * ह्या चिट्टीवरून बाळाजीवर शाहूचा फारसा विश्वास होता असे दिसत नाही. रघोजी भोसले व दाभाडे ह्यांना बोलाविलें असतां ते येऊं पावलें नाहींत. तेव्हां ॥ फौज धरनें" त्यांच्या दैवीं नाही अशी शाहूची खात्री झाली. त्यांना सामर्थ्य असते व अक्कल असती तर ते महाराजांच्या आज्ञेबरहुकूम केव्हांच येऊन पावते. ते आले नाहीत तेव्हां. बाळाजीच्या स्वाधीन फौजेचा (१) अधिकार देण्याखेरीज शाहूला गत्यंतरच राहिले नाही. बाळाजीचा ओढा संभाजीराजाकडे विशेष. तेव्हां ( २ ) त्याला बिलकुल आणूं नये असें शाहूनें लिहून ठेविलें. ( ३ ) वंश आहे तोच चालवावा ह्मणजे राजारामाचा पुत्र जो . * ही चिट्टी काव्येतिहाससंग्रहांत छापलेली प्रसिद्ध आहे. विराम चिन्हें देऊन ती मी येथे छापिली आहे. (*) नाहींच्या बद्दल कांहीं, 'वंश' ह्याबद्दल वंस,**ह्या फुल्यांबद्दल 'ह्मास अंतर' शब्द असावे असे सुचविणे मला योग्य वाटते. मूळ लेखाची जशीच्या तशी नकल काव्येतिहाससंग्रहांत छापिलेली नाही, कारण, झाले, वंश, इत्यादि शब्द मूळांत जाले, वंस, असे लिहिले असले पाहिजेत. अस्सल लेख जशाचा तसा मिळाल्यास अनेक शंकांचे निवारण होईल. (१) अक्षर शाहूचे आहे की नाही ते कळेल. (२) कागदावरून व शाईवरून लेख बनावट आहे की काय त्याचा निर्णय होईल. (३)व मुळ लेखांतील अक्षरें जशीच्या तशीच काय आहेत ती कळतील. चिटणिसांच्या बखरीतील हकीकतीवरून हा लेख अस्सल असावा असें बव्हंशी ह्मणण्यास हरकत नाही. इतकेंच की बखर लिहिणान्याच्या पूर्वजाच्या हातांत ही चिट्टी शाहूने दिली असल्यामुळे, तिच्या खरेपणाविषयी थोडा संशय येतो.