पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/438

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उतावळी न करावी, तेथेच राहावे. असे प्रकारे लेहून पाठवणे, मुलकाचा मजकूर तर तुर्त मुलकाचा पेंच नाही. आह्मी आगरियाजवळ आहों. सुजाअतदौलाचा स्नेह आहे तो पेंच कांहीं पडत नाही. परंतु, आपल्या जागा असतील त्यांत दारू, गोळी, दाणा वगैरे सरंजामाचा गल्ला भरणे. मजबुदी ठीक करणे. यद्यप पेंच पडल्यास झुंजत परंतु काही भय मानून काही जागा न सोडीत असे करणे. रूबरू बोलणे जाहाल्यास भावगत जशी कळेल तसे त्याशी बोलावें यास्तव यांस पाठविले आहे. जसे देखतील तमें बोलतील. यास्तव तुझी त्यास आशाच लाऊन ठेऊन तिकडे न जात तें करणे. त्यासहि पत्र पाठविलें असे. त्याचाहि मसुदा पाठविला असे. र॥ छ ११ जिलकाद. बहुत काय लिहिणे. हे विनंति. PRESIDERSTANEPACROELA २०९ ] पे॥ छ ८ मोहरम. ॥ श्री ॥ २६ जून १७६०० राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुझी दोन पत्र पाठविली ती पावली. अबंदीली, रोहिले यांचा मजकूर विस्तारें लिहिला त्यांत २९० कोळजळेश्वराच्या वरती राहून अबदालीने नजीबखान व ज्याहानखान यांस मरायांच्या मुलुखांतील ठाणी मारण्यास व सुजाअतदौल्यास घेऊन येण्यास पाठविलें होतें. भाऊसाहेबांचे सैन्य आग्रयाजवळ आल्यावर नजीबखानाला अर्थातच मराठ्यांच्या ताब्यांतील इटाव्यास राहतां न येऊन तो अबदालीच्या सैन्यास मिळण्याच्या हेतूने परतला. पुढे मराठ्यांचें सैन्य आग्रयास यमुनेच्या दक्षिणतीरी उतरलेले पाहून अबदालीहि त्या नदीच्या उत्तरतीराला येऊन थडकला. नंतर भाऊसाहेब कुंजपुरा घेऊन परत येईतोपर्यंत अबदाली यमनेच्या पैलतीराने मराठ्यांच्या सैन्याच्या समांतर चालत होता. रा. पारसनीसकृत मराठ्यांचे पराक्रम, बुंदेलखंडप्रकरण ह्या ग्रंथांत एक पानिपतच्या लढाईची अपूर्ण बखर छापिलेली आहे. त्यांत भाऊसाहेब शिंदेहोळकरांना घेऊन माळव्यांतून हिंदुस्थानच्या रोखें येत असतां अबदाली अटकेवर आला व तो यमुना उतरून आठ दिवसांत मराठ्यांशी टक्कर दे