पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/437

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१२ ते तेथेच राहात बलकी माघारे फिरत असें करवणे. हे उभयतां पुढे पोहोंचल्यावरी यांणी लिहिल्यास तुझी फौज सुद्धा जाऊन पोहोंचणे. वरचेवर तिकडील मजकूर लिहिणे. जाणिजे. सारांश, सुज्याअतदौला याचे मतलब तुह्मी लिहिले तेच पक्के त्याशी बोलावे. त्याची निशा करावी व त्याजपासून आपली निशा करून घ्यावी. याचे लांब बोलणे करणे. रूबरू बोलोन पाठवावे. या गोष्टीस तुह्मी जवळ असतां तर ठीक पडतें. तुही जवळ नाही, यास्तव तुमचे जाणे लांबणीवर पडतें. रवानगी लवकर व्हावी यास्तव या उभयतांस पत्रे देऊन सविस्तर सांगून रवाना केले असेत. तुमीहि त्यास पुढे लेहून इतकेंच पाठवावें की तुमचे मतलब तेच तुह्माशी लांबलचक बोलावे व तुमची पुरती निशा करून घ्यावी व आपले तर्फेची निशा करून घ्यावी, यास्तव यांस रवाना केले असेत; येतील तोपर्यंत जावयाची छत्रपति यांची पंतप्रतिनिधी, कैलासवासी भवानराव याजवर बेमर्जी झाली होती ते काळी प्रतिनिधीची वस्त्रहि, यांजला दिल्ही. शिंदे अलिजावहादर यांचे दिवानगिरीचे कामावर आमचे आजे त्रिंबकराव नारायण यांजला पाठविले. झांशी सुभ्यास पुतणे, लक्ष्मण शंकर यांचे चिरंजीव, विश्वासराव लक्ष्मण ठेविले. प्रतिनिधीचे कामावर आपण नारो शंकर राहिले. यानंतर श्रीमंत कैलासवासी भाऊसाहेब पेशवे हिंदुस्थानप्रांतीं जाऊन सोनपतपानपतचे लढाईत गारद जाले. ते काळी कामकाज नारो शंकर यांणी दिल्लीस केले. तेव्हां राजेबहादर किताब खुदावंत पातशाहा यांचे येथून जाली आहे. पुढें कैलासवासी श्रीमंत थोरले माधवरावसाहेब व दादासाहेब चुलते पुतणे या उभयतांचे वाकडे आले. त्या प्रसंगांत लढाया वगैरे कामेंकानें झाली. तेव्हां पंधरा लक्षांची जाहागीर दिल्ह्यावर कर्नाटक प्रांती वगैरे लढाईची कामें पडली. कोठेहि कमती पडली नाही. कैलासवासी ती॥ बाप्पासाहेब यांस स्वदेशी व हिंदुस्थानप्रांतीं सरकारसेवा घडली. सारांश, वडिलांनी पराक्रमानेच मातवरी मेळविली. याचा पूर्वापार मार लिहिला असतां विस्तार कोठवर लिहावा. कोणते तेरिखेस व कोणते सनांत काय जें प्राप्त जाले हे तपशीलवार लिहून पाठवावें तरी आमचे दौलतीत हाली माजी होत गेल्यामुळे कागदपत्र दाखलेशीर राहिला नाही. काही राहिले तेहि मालेगांवचे लढाईत गेले. इ. इ. १८१८ च्या १३ जूनला मालेगांवचे लढाईत मालेगावचा किल्ला जळून जमीनदोस्त झाला व त्याबरोबर आंतील दफ्तरहि खाक झाले. पानिपतची लढाई १७६१ त झाली व नारो शंकराला प्रतिनिधीची मुतालिकी १७६२ त मिळाली. यादीत मजकूर वरखालती झालेला आहे. यादी इ. स. १८३३ त लिहिलेली आहे.