पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/436

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३११ जा सकता है। समाना


- -- - GER बोलत गेला त्या॥ शेवटास न्यावें, हेच उत्तम आहे. असे प्रकारे लेहून, कारांतून काल्पी सुभ्याचे काम हिंदुस्थान प्रांती केले. नारो शंकर हे कैलासवासी थोरले मल्हारजीवावा सुभेदार होळकर याजकडे जाऊन रोजगाराची पैरवी करून, शिलेदारी प्रथम केलियावर, कांहीं काजाखीचे कामकाज केल्यावरून पागा, नगारा, निशाण सुभेदार यांणी देऊन आपले लोभांतच ठेविले होते. श्रीमंताकडील फौज व नायगावकर वगैरे यांच्या पागा हिंदुस्थानांत जाऊन वोडसेवाले राजे यांची विलासाची व शिकारीची जागा झांशी घेऊन काही अंमलहि बसवू लागले. त्यावरून जमेत करून याचा कटा केला. नायगावकर मारिले गेले. हा मजकूर पुण्यास कळल्यावर मागती येथून तयारी करूं लागले. त्यांत कोणाची हिंमत न होय. तेव्हां सुभेदार यांणी श्रीमंतास विनति केली की आमचे पदरीं नारोशंकर मनुष्य कजाख आहे. त्याजला इंदूर सुभ्याचे कामावर ठेविलें आहे. त्याकडे ही मोहीम सांगितली असतां करण्यायोग्य आहे. श्रीमंतांनी मान्य करून नारोशंकर याचे नांवें पत्र व सुभेदार यांणी आपलें पत्र पाठविले. त्यावरून इंदूरचे कामावर कारकन ठेऊन पुण्यास आले. सुभेदार यांणी श्रीमंताची भेट करवून मोहिमीची वस्त्रे दिल्ही. आणि पांच हजार फौज तैनाती देऊन इतलाखी फौज ठेवण्यास सांगून हिंदुस्थान प्रांती रवानगी करून दिल्ही. तिकडे फौजेसुद्धा जाऊन, वोडसेवाले याचे राज्य घेऊन, राजे हस्तगत करून, आसमंतात् गिरास होते त्यांचे पारपत्य करून, झांशीस ठाणे घालून, सरकारास मार लिहन पाठविला. त्यावरून सरकारची मी प्रसन्न होऊन, झांशी सुभ्याची वस्त्रे व शिरपेंच, जी. चौकडा हुजरेयाजवळ देऊन पाठविले. नारो शंकर यांणी राजे यांचे संस्थान राजाकडेस कायम ठेऊन झांशीसुभ्याकडे कांहीं सरकार खालसा महाल करून घेतले. व अवांतर मांडलिक राजेरजवाडे यांजकडूनहि कांहीं सुभ्याकडेस अजमासें तीसपस्तीस लक्ष परियंत आकार जमेचा करून घेऊन, झांशी खेडे होते त्याची वसाहत करण्याबद्दल लाखो रु॥ खर्च करून सुभा राहण्यालायक जागा केली. श्रीमंतास गैरवाका कोणी समजाविल्यावरून नारोशंकर याजला पुणेमुक्कामी बोलावून आणिलें ते काली कांही इतराजीचा डौल दिसण्यांत आला. सुभेदार मुरब्बी; ते हिंदुस्थानांत-शिंदे अलिजाबहादर पुण्यास होते. त्यांची हिंदुस्थान प्रांती रवानगी होऊ लागली ते समयीं नारो शंकर यांणी अलिजाबहादर याजकडेस सांगून पाठविलें की सुभेदार प्रसंगी नाहीत, सरकारमर्जी तो रुष्ट दिसते. यावर आलिजाबहादर यांणी अभय सांगून पाठविलें की जे सुभेदार तेच आह्मी, काळजी न करावी. शिंदेबहादर हिंदुस्थान प्रांती जाण्यास निरोप घेतेसमयीं सरकारास विनति केली की नारो शंकर यांणी सरकार चाकरी करून किफायत केली असतां खावंदांनी गैरवाका ऐकून माणसें वाढलेली ती मोडावीत असे होऊ नये; त्याजला आमचे बराबर दिल्हे पाहिजे; त्याखेरीज आमचे जाणे होणार नाही. खावंदांनीहि त्यांचे पराक्रमावर नजर देऊन सरकारांतून सरदारीची वस्त्रे दिल्ही. व शिंदे बहादर यांणींहि आपले दिवानगिरीची बस्त्रे व श्रीमंत महाराज Sabin