पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/435

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१० २०८] ॥श्री॥ २५ जून १७३०. राजश्री गोविंद बल्लाळ गोसावी यांसिः विनंति उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. सुज्याअतदौलाचा मजकूर विस्तारें लिहिला व तुह्मीं त्याशी इतबार पुरावयाचे लिहिलें तें कळलें. ऐशियास, तुझी त्याशी बोलला व तेहि. तिकडे जात नाही असें बोलतात, हे यथार्थच. परंतु, तुर्त ते बोलतात एक, करतात एक, असें आमच्या बातमीचे रीतीने दिसते. कसे ? तरी, अलीकडे फौज उतरली, आपणहि अलीकडे आले आणि नजीबखान यास ठेऊन घेतले आहे. त्यास, त्यांणीं जेव्हां त्यास ठेऊन घेतले, तेव्हां एक प्रकारे दिसते. यास्तव कितेक त्याचे मतलब होऊन आमचा उपयोग पडावा यास्तव विस्तरें मजकूर सांगून राजश्री मिाजी अनंत व राजश्री नारा शंकर यांस रवाना कलें आहे. व फौज मागून येऊन पोहोंचली. त्यास, तुह्मीं पुढे सुज्याअतदौला यास लेहून पाठवावें की यांस कितेक आपले खातरदास्तीस्तव, सरकारचे उपयोगास्तव रवाना केले असेत ; हे येतात व फौजहि मागून येते तों तुह्मीं तेथें मुकाम करावा ; नजीबखानास लावून द्यावे आणि तागायत २८९ रामाजी अनंत व नारो शंकर यांच्या दफ्तरी हिंदुस्थानांतील घडामोडीसंबधी पत्रे असावी. विठ्ठल शिवदेव, हिंगणे, अंताजी माणकेश्वर ह्यांच्याहि दफ्तरी ह्या घडामोडीसंबंधी कागदपत्र सांपडावे. आह्मी विठ्ठल शिवदेव, नारो शंकर व रामाजी अनंत ह्यांच्या वंशजांच्या गांवीं ह्मणजे विंचूर, मालेगांव इत्यादि ठिकाणीं शोध केला; परंतु, कागदपत्रांचा सुगावा लागला नाही. वर सांगितलेल्या पुरुषांचे कागदपत्र सांपडल्यास हिंदुस्थानांत मराठ्यांनी १७१४ पासून १७६१ पर्यंत ज्या कामगिया केल्या त्यांचा समग्र इतिहास कळेल. नारो शंकर यांच्यासंबंधी एक यादी मालेगांव येथे आह्मांस मिळाली तिच्यावरून तेथील दफ्तराची हकीकत कळून येईल. ॥ श्री॥ यादी शिवराव गोपाळ राजे बहादर संस्थान मालेगांव सु॥ सन १२४२ फसली. ती॥ कैलासवासी नारो शंकर नानासाहेब राजेबहादर हे त्रिवर्ग बंधू. यांचे वडील पूर्वी बिज्यापूरचे सुभ्याकडेस दिवानगिरीचे कामावर होते. असो. अलीकडील मजकूर. अबाजी शकर हे श्रीमंत पेशवे यांचे दरवारांत रोजगारास होते. लक्ष्मण शंकर यांणी पेशवे सर