पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/434

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २०७] ॥ श्री॥ २४ जून १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणे. विशेष. तुही पत्रे सप्तमीची पाठविली ती प्रविष्ट जाहाली. त्यांची उत्तरें पुरवणियांत लिहिली त्यावरून कळेल. येथे दरमहा पाँच सहा लाख रुपये लागतात. तरी तुह्मांस लिहिल्याप्रे॥ मातबर ऐवज येऊन पोहोचे ते करणे. सुजाअतदौलाची पत्रे पाठविली आहेत. ही दो दिवसांत त्यास पाव तें करणे. कड्याकु-याविशीं नजीबखानास दोन अडीच लक्ष रु॥ द्यावे याचे र॥ गोपाळराव गणेश यांचे पत्र पाठविलें तें पावलें. त्यांस तुह्मी लिहिलें तें उत्तम. आँती रु।। त्यांस का द्यावे ? न द्यावेच. जाग्याजम्यांची बंदोबस्ती उत्तम प्रकारे करून राहावे. र॥ छ १० जिलकाद. बहुत काय लिहिणे. हे विनंति. २८७ पानिपतच्या मोहिमेस एकंदर जो सैन्यसमूह जमला होता, त्याचा सगळ्याचा खर्च भाऊसाहेबांस द्यावा लागत नसे. सरंजामी सरदार आपापल्या सैन्यांचे खर्च चालचीत.भाऊसाहेबांना आपल्या स्वतःच्या सैन्याच्या खर्चास दरमहा सहा लाख रुपये लागत. पानिपतची मोहीम शके १६८१ च्या वद्य त्रयोदशीला ह्मणजे इ. स. १७६० च्या १५ मार्चला सरूं होऊन १४ जानेवारी १७६१ ला संपली. ह्मणजे ही मोहीम बराबर दहा महिन्यांना एक दिवस कमी इतके महिने चालली होती. दरमहा सहा लाखप्रमाणे दहा महिन्यांचा साठ लाख खर्च होतो. व शेवटल्या चार महिन्यांतील महागाई लक्षात घेऊन दरमहा दहा लाख जास्त खर्च धरिल्यास ह्या शेवटच्या चार महिन्यांचा ज्यादा खर्च चाळीस लाख होतो. एकंदर सुमारे एक कोटी रुपये एकट्या भाऊसाहेबांचे सैन्याच्या खचाला लागावे असा अंदाज होतो. भाऊसाहेबांचे सैन्य पन्नास हजार पडदुराहून निघतेवेळी होतें असें बाबूराव खेराच्या १६ व २० मार्च १७६० च्या पत्रांत आहे. २८८ ह्मणजे लढाई सुरू झाल्यावर.