पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/433

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुंता पडणार नाही. सारे एक होऊन करणे. जाणिजे. + गोपाळराव, गणेश संभाजी, तुझीं, अकबरपूरकर, सर्व जमा होऊन आपली जागा कायम करणे.. शिंद्याकडून भिकारीदास सुजादौला ह्याकडे आहे. त्याचेंच पत्र आले की नजीबखानास निरोप देऊन गंगापार आहेत. तुह्मांसाह, वर्तमान कळलेच असेल. मुकासदाराचे तेहि साहित्य करितील. तुह्मीं जमा होऊन अंमल आपला करणे. नजीबखान, जहानखान अबदालीकडेच जातील. हाफिजाचे बोलीवर अबदाली नजीबखानास टाकून जाईल. न गेला तर सरदार, आमी, जाट एक होऊन यमुना उतरून पारपत्य करूं. कोणे चिंता न करणे, सलाबत दुरून भारी असते. येथे सर्व कळलें. लौकरच उत्तम होऊन येईल. ॥ छ ५ जिलकाद. ऐवज जरूर खर्चास अठापंधरा रोजांत येईसा करणे. हे विनंति. [२०६] पे॥छ १० जिलकाद ॥ श्री ॥ १९ जून १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. येथे खर्चाची वोढ फारच जाहाली आहे. तुझी ऐवजाची तरतूद करून ऐवज सत्वर पाठवणं, ह्मणोन वारंवार लिहीत असतां, ऐवजाची तरतूद केली आहे ऐसें मात्र शोभेस लिहिता. परंतु, ऐवज रवाना करीत नाही. हे गोष्ट उत्तम नसे. हाली हे पत्र लिहिले असे. तरी पेशजी लिहिल्याप्रे॥ एवज सत्वर पत्र पावतांच हुजूर रवाना करणे. विलंब एकंदर न लावणे. जाणिजे. छ ५ जिलकाद, सु।। इहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणे. हे विनंति. २८५ कोणाचीहि व विशेषत: येथे अबदलीची. २८६ शेवटी अखेरपर्यंत गोविंदपंतानें ऐवज पाठविला नाही. डिसेंबरांत बाळाजी गोविंद व पाराशरदादाजी यांजबरोबर पाठविला तो अवदालीच्या लोकांनी मध्येच लुटिला.