पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/432

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करावें, याचा भरंवसा फार होता. माधवसिंग याचा विश्वास होता. त्यास त्याणी फौज तयार केली. आपण येणार. कमाविसदार वकील सोडिले. इतके त्याणी केले. याचा भरंवसा असोन हे गोष्ट सहसा याणी करूं नये. अबदाली उपरी. किती दिवस पुरवेल. आह्मी नेहमी आहों. श्री कृपनें हरएक गोष्ट सत्वर होऊन येईल. आतां त्याणी उलग नसावे हे उचित असे. जाणिजे. + सरदार आह्मी एक होऊन सत्वर जें करणें तें करूं. याउपरि त्याचा जाबसाल तोडून एकपक्षी पुरतें व्हावें. आतां तिकडे जातील, तर नेहमी आह्मांकडे तोडून जाणे तरी जावें. सर्व अर्थ गरम नरम होऊन त्याचे जाणे तिकडे न होय तें करणे. वर्तमान वरचेवर लिहीत जाणे. ॥ छ ५ जिलकाद. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२०५] ॥श्री॥ १९ जून १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि. सुज्याअतदौला यांणी नजीबखान यास साफ जाब दिल्हा की आह्मी मराठियांकडे आहों, तुह्मी अबदालीस बिदा करणे. त्याजवरून ते फारच खट्टे होऊन निरोप घेऊन गेले. त्यास, आह्मी जवळ आलों; सुज्याअतदौलाचा जाब तसा जाहाला; आतां, नजीबखान याचे वस्तू काही तिकडे राहावत नाही. तुझी इटावियास येऊन त्याचे फौजेस धुडावावें. आपली ठाणी जी गेली असतील ती कायम करणे. सुज्याअतदौलाहि तुमचे कुमकेस फौज पाठवितील. त्यास लेहून पाठवणे. ते बोलत होते की गोविंदपंत इटावियास असते तरी नजीबखान कांही त्याजवर न जाता. परंतु हेच गेले असते तरी आह्मी फौज पाठवितों. असें भाषण केले. असो. त्याजवर. काय आहे ? तुर्त तुही त्याचे लोक उठवून आपला अंमल करावा. यास २८४ इटाव्यास.