पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साल आहे. जें ठहरेल तें लिहून पाठवू. जाणिजे. छ १ जिलकाद. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२०४ ] ॥ श्री॥ १९ जून १७६०. राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरि. सुज्याअतदौलाचा मजकूर दोन तीन पुरवणियांत लिहिला. त्यांत मुख्य मजकूर हाच की नजीबखानाचे जाणियामुळे अबदालीकडे जाणार. परंतु अद्यापि उलग आहे ह्मणोन. तरी खासास्वारी जवळ अगरियास यावी ह्मणजे आपण त्यास मिळत नाही असे लिहीत असतां, त्यांणी, आह्मी जवळ आलों असें असतां, हा विचार मनांत आणिला हे गोष्ट त्याचे दूरदेशीस व चालत आल्या लेहास अयोग्य व त्यास ही गैर नफियाची गोष्ट आहे. कशी? तर हाफीजरहिमत याचे मारफातीने सरदारांशी राजकारण अबदालीचे लागले आहे. बोलोनहि हाफीज गेला आहे. हे ठीक जाहलें तरी जाईल व ज्यांणी ज्यांणी लबाडी केली त्याचे पारपत्य हातून होईल. कदाचित् राहिला तर आह्मी, सरदार व जाट येका दो दिवशी अगरियाजवळच एक होऊन पार उतरून उत्तम प्रकारे पारपत्य करितो. सर्वहि गोष्टी उत्तम होतील. आमचा इतका जमाव पडला असतां त्यांत सुज्याअतदौला जाऊन फसतील. एक तर आमचा पुरता दावा पडेल. आणि अबदालीस पैका न मिळाला नजीबखानानें कबूल केला आहे त्यास पैक्याचे कूळ हेच आहेत. यास त्याजपासोन उलगावावें मणजे सहजच पैका देणे आला. हेहि गोष्ट त्यास वाईट. याचाहि विचार दूरंदेशीनें केला असेलच. यांतून जाणार नाहीत. तथापि त्यास कोण्ही बहकावितात. तर हे त्यास हे उमजवावें. सर्वथा त्यांणी न जावें. नजीबखानास साफच जाब द्यावा ; लावून द्यावा. त्यांणी पार राहावे. इकडे यावयाचे