पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/430

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांची गत काय जाहाली ? हाल काय जाहले ? यास हरमें॥ न्यावें, तेथे नेऊन फसवावें, रोहिल्याने पैका कबूल केला त्यास जागा नाहीं, लटकी आशा दाखवावी, फसवावें, त्याचे जबरदस्तीखाली हे सांपडले झणजे याजपासूनहि पैक्याची इच्छा करावी, न कबूल केले तरी मग अबदालीचा प्रकार कळतच आहे. असे प्रकार घडतील. हहि त्यास आपले तर्फेनें हितोपदेश सांगावा. इकडे उपयोगी आहेतच ते दृढ करावे. हिंदुपत वगैरे यांस पत्रं गेली. तुह्मी लिहिणे. लौकर येत तें करणे. शाहाजादियाकडीलहि वर्तमान लिहिणे. सुजादौला त्याचा पैगाम तोडून आमचे पुर्ते होऊन सामील होतील तर त्याचे हातेंहि मातबर बंदोबस्ताचें काम घेऊ. निर्मालय जाले ते आमचे कामाचे काय ? हे चांगले असून काम न करतील, घरी राहून दोहींकडे पाहतील तर त्यांसच पुढे पेंच. तर या समयीं आह्मांकडे यावे. तसेंच फरकाबादवाले आणणे. हे विनति.. [२०३] ॥श्री॥ १५ जून १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः ।। पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुहीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिले वर्तमान सविस्तर कळले. ऐशास इकडील सविस्तर वर्तमान लिहिणें तें पेशजी पत्री लिहिलेच आहे. त्याजवरून कळलेच असेल. + सुज्याअतदौला याची व नजीबखान व ज्याहानखान याची भेट जाहली. त्यास याउपरि त्यास त्यांणी साफ जाब देऊन निरोप द्यावा आणि एकपक्षी कराराप्रमाणे इकडे यावयाचें करावें. सरदारांच्या भेटी दोती दिवशी होतील. गंगोबा आले. भेटलेयाउपरि पुरती तजवीज करणे ती करूं. तहाचा जाब