पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/429

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ ॥ श्री॥ पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-- विनंति उपरि. तुझी दोन पत्र पाठविली ती पावली. यांत मुख्यार्थ की मातबर फौजेनिशी सत्वर यावे. सुज्यातदौला सर्व प्रकारे स्वामीच्या येणियामुळे येऊन सामील होतील. अबदालीकडे जात नाही. राजकारणहि राखून ठेविलें आहे. ह्मणोन विस्तारें लिहिलें तें सर्व कळलें. ऐशियास, खासास्वारी दरमजल बोडसियास आली. पुढे दरमजल तुह्मी लिहिल्या रोखेंच येऊ. सरदारांसहि लिहिले असे. त्यांचींहि पत्रे जशी येतील त्यासारिखा रोख धरूं. त्यास सुज्याअतदौलाचे राजकारण फार करून दाखवावें. सरकारचे काम व यास मातबर इच्छेनरूप पदारूढ करवावें याचा कितेक अर्थ तुझी बोलत होता तो प्रकार बनला नाही. परंतु हल्ली मल्हारबांनीहि त्यास बहुताप्रकारे लिहिले आहे. व यांशीहि स्नेहाचा फारच याचा राबिता आहे. या दिवसांत आमचेंहि येणे जाहलें. येणेकडून कितीक उमदी कामें घडणे. हे दिवस रुबकार जाहाले. यास्तव तुझी जे बोलत होता ते सुज्याअतदौला यास एकपक्षी करून घेऊन यावें. आणि तैमुरियाचे पातशाहीचा बंदोबस्त करावा. अबदालीस खूब तंबी करावी. मल्हारबाचा या गोष्टीविशीं संशय न आणावा. तेहि याच कामावर तयार आहेत. सुज्याअतदौलाविसीं कांहीं दुसरा मजकूर नाही. आतां सुज्याअतदौलाने आपले तर्फेनें निदर्शनास आणून देऊन पुढे फार दिवस स्नेहाची मजबुदी चालोन येईल ते गोष्ट त्यांणी करावी. त्यास, तुह्मीं हा सर्व अर्थ पहिल्या लिहिल्यावरून त्यास कळवून त्यास या कामावरी सिद्ध केले असेल. कदाचित् मळमळीत प्रकार असेल तर जो तुह्माजवळ त्याचा पुर्ता वळखी असेल त्यास तेथे पाठवून त्यास भरंवसा पुरवून यावयाचे करीत तें करणें. अबदालीस तो साफच जाब द्यावा. मलकाजमानी सुज्यातदौलाकडे गेली आहे ह्मणोन कळलें. ऐशास, अबदालीचे जबरदस्तीखाली बाईकाचे भरंसियावरी जावें, त्याची जरब आपण सोसावी, हे काहीं यास योग्य नाही. मागे जे जे त्यास भेटले