पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/428

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. विशेष. तुह्मांकडे सालमजकुरची रसद महालानिहायची रुपये ११००००० अकरा लक्ष रुपये येणे. त्याचा भरणा स्वारीकडे करणे. तीर्थरूपाकडे पुणियास न करणे. येथून लेहून पाठविले आहे. याखेरीज सालगु॥ सनसितैन व मागील बाकीचा ऐवज महाल॥ तुझांकडे येणें आहे. त्यास, तूर्त कांहीं स्वारीकडे ऐवजाची ततूद करून पाठविणे ह्मणोन लिहिले होते. परंतु कांहींच ऐवज आला नाही. मसलतीचे दिवस, फौजस पोटास जरूर द्यावे लागते. सर्व तुह्मांस ठाऊक आहे. तुही मातबर मामलेदार बहुत दिवस या प्रांतास माहीत. सावकारीमध्ये पत उत्तम प्रकारची. या समयांत तुह्मी हरप्रयत्नेकरून जो ऐवज लागेल तो मेळवून द्यावा. असें असतां कांहींच तरतूद न जाली. अपूर्व आहे ! अंतरवेदीत मात्र पठाणाचा दंगा जाला. त्यास तुह्माकडील परगणेयांस फारसी तसदी लागली नाही. कदाचित् लागली असती तरी तुह्मीं ऐवज मेळवावा. मातबर काम पडल्यास दोन सालाचा सारेच मामलतीचा ऐवज अगोदर घ्यावा. अशीच तुमची सचोटी सावकारीमध्ये आहे ह्मणोन लिहिले आहे. तरी सर्व समजोन लिहिल्याप्रमाणे ऐवजाची तरतूद करणे. सालमजकूरचे रसदेची अगोदर सूचना लिहिली आहे. हाहि भरणा लौकरच करावा लागेल. याची तजवीज करणे. जाणिजे. छ २६ सवाल, सु॥ हि हिदे सितैन मयावअलफ. + बहुत काय लिहिणे. देशी ऐवज न पाठविणे. येथेच दोन महिन्यांत भरणा करणे. वारंवार लिहिला असून ऐवज न आला. तुमची पत आहे. काम पडले असून मनन वाढवावें. तेव्हां मनसबा शेवटास गेलियावर पैका द्याल. तोपर्यंत भरंवसा येत नाहीं हे उत्तम नाही. सत्वर तरतूद, रसद व बाकीचे ऐवजी ब॥, तूर्त पाठविणे. हे विनंति. GENERA सार्वहाराक जानकार खेड, ( .)