पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जवळ जातो. नजीबखान व ज्याहानखान माघारे फिरतील.न फिरले तथापि सुजाअतदौला यांणी इतके दिवस येथील लक्षाने राहिले. आतां सरदार आह्मी एक जाहालो. याउपरि यांणींहि यावें, अबदालीचे पारपत्य करावे, दिल्लीतील बंदोबस्त व पातशाही पूर्ववत् करावी, हे काम सोडून त्यास भिऊन त्याजकडे जावयाची तजवीज करितात. तरी अबदाली त्याचे तालुक्यांत उतरून येत नाही. त्याजकडे त्याचा उपद्रव काय आहे ? त्यास, आतां तरी सर्व प्रकारे आमचा मनसुबा उत्तम आहे हे, यावें हेंच यास योग्य, असे पत्रहि लिहिले आहे. त्याजकडे पाठवणे आणि तुलीं लिहिणे. कोणी पाठवावयाचा असेल तर पाठविणे. आणि दुसरा विचार सर्वथा न करीत ते गोष्ट करून त्याचा इकडे यावयाचा प्रकार करणे. सरदारांकडून करारबादहि जाणे तो गेला असे. त्याजवरूनाहि त्यांणी आपली पक्की खातरजमा करून घ्यावयाची तर घ्यावी. दुसरा विचार याउपरि सहसा न करावा. नजीबखान ज्याहानखान यांणी कच इटाव्याहून केलें. कोळेकडे येतात अशी खबर आहे. हे इकडे आले तरी तुमचा उगला तिकड असावा ह्मणजे सुजाअतदौला तुझासी नीट बोलतील. ठीकच हाईल. जाणिजे. छ २५ सवाल. + तुही, गणेश संभाजी, बाबूराव कानेर, अबदाली काळेहून यमुना उतरून अलीकडे येऊ लागले तरी, अंतरवेदींत सर्वांनी उतरून पायबंद द्यावा. कदाचित् दिल्लीकडे चालला तरी सहजच ठाणी सुटतील. तुमी बसवीत जावी. दोनचार रोजांत सरदार आह्मी एक होऊन लढाईची तरतूद करणें तें करूं. सुजादौलांनी दम धरावा. त्याकडे न जावे. असे असून न आइकतील तर आमचा नेहमीं पंच पडेल. सर्व गरम नरम होऊन मायेंत मेळवून तिकडे न जात तें करणें. ॥ छ २५ सवाल. हे विनंति. [ २०१] ॥ श्री॥ ११ जून १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः--