पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/426

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याकडे जात होते ते माघारे आले. परंतु तुमचें या मजकुराचे लिहिले आले नाही व नजीबखान व जाहानखान बिठुरास गेले हेहि वर्तमान आले. त्यास, तुह्मी कोठे आहां ? काय मजकूर ? सुज्याअतदौल्याचा विचार काय? तृमीं त्यास सर्वविशी लिहिले की नाही ? इतके दिवस बोलत होते तें निदर्शनास यावें. आह्मी जवळ आलो. सरदार आही येक होताच शत्रूच्या पारपत्याचा विचार घडेल. त्यास, सुज्यातदौला यांणी फौजसुद्धा सामील व्हावयाचा विचार करावा. सांप्रत नजीबखान यांचे राजकारण लागले आहे. त्यास, याचा आमचा स्नेह असतां त्या राजकारणाची आस्ता करावी हे उचित नाही व ते करणार नाहीतच. परंतु आलें राजकारण तोडूं नये या भावें बोलत असतील तरी तेंहि न बोला. त्याचे राजकारण तोडून यावयाचं करावें. हे आलियावरी सर्व बंदोबस्त व उचित गोष्टी, पातशाही कामें, व अलीगोहर आणून पातशा करणे, इत्यादिक सर्व होऊन येईल. तरी याचा प्रकार सर्व त्याचा लेहून पाठवणे. संशय न राहाता येत असें करणे. तुमचे पत्र तिकडील बातमी वरचेवरी या दिवसांत यावी, हे करणे. जाणिजे. + छ २३ मवाल. बहुत काय लिहिणे. हे विनति. - - - [२० ] ॥ श्री ॥ १० जून १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥. विनंति उपरि. तुझी पत्र पाठविलें तें पावलें. सुजाअतदौला याचा प्रकार इतके दिवस ठीक होता. परंतु आतां आझांस एक प्रकार लिहितात. त्यास स्वामी आगरियास आले झणजे नजीबखान, ज्याहानखान माघारे कोळेस जातील आणि यांची व सुजाअतदौलाची गांठहि पडणार नाही ह्मणोन कितेक लिहिले ते कळले. ऐशियास आह्मी चमेल उतरलों. आगरे अठरा कोस आहे. एकादों दिवशी सरदार आमी एक होऊन पार उतरावयाची तजवीज करणार. अगरिया