पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार सु॥ ईहिद सितैन मया व अलफ. सेदवाईचे ठाणे कटारेवाले यांणी घेतले आहे तरी तुह्मी बापूजी नारायण याजला सामील होऊन, ठाणे घेऊन, म॥निलेयाचे स्वाधीन करणे आणि कटारेवाले याचे पारपत्य उत्तम प्रकारे करणे. जाणिजे. छ १९ शौवल. आज्ञाप्रमाण. [१९८] ॥ श्री ।। ६ जून १७६०. राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:विनंति उपरि. यमुने पारवारच्या नांवा सान्या जमा करून आपले हुकुमांत ठेवाव्या, त्यास प्राप्त न व्हाव्या याप्रमाणे करावयास लिहिलेच आहे. त्या बमोजीब कोठे केलें, कोठे न केले, ते लिहिणे. + जेथे बंदोबस्त जाहाला असेल तेथील जाहाला. पुढे ठीक राखाव्या. नसेल जाहाला तेथील करणे. जाणिजे. छ २१ सवाल, सु॥ ईहिदे सितैन मया व अल्लफ. हे विनंति. [ १९९] ॥श्री॥ ८जन १७६०. राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिःपोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. पत्र तुमचे तूर्त येत नाही. आता खासास्वारी चमेलीवर उत्तर तीरी आली. सरदाराच्या भेटी लोकरीच होतील. हफीज रहिमतखान आला आहे. याचेंहि बोलणे चालणे होऊन काय ठहराव होणे तो होईल. लेहून पाठऊं. त्यास, सुजाअतदौला पटणि.