पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/424

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होणें तो होत आहे. कांहीं ठहरून गेले तर जातील. राहिले तरी त्याचे पारपत्याचा विचार उत्तम रीतीने केला जाईल. सुजाअतदौला यांणी वजिरीची वस्त्रे व पातशहा शाजादियास करावा हे अबदालीने केलें तें कबूल केले आहे ऐसें, वस्त्रे घेतली त्यांत निघतें. आणि माघारे गेले होते तेहि फिरोन आले, असेंहि आहे. याजवरून त्याचा प्रकार एक प्रकार दिसतो. त्यास, अबदालीजवळून वजिरी घ्यावी, अलीगोहर याची स्थापना करवावी, रोहिले यांचे तलहूं राखावें, हे काही सुजाअतदौलास उचित नाही व याचा आमचा घरोबा, सरदारांशी स्नेह, व हे हिंदुस्थानचे पातशा, यांणी त्या पातशाचे हातें स्थापना करून घेणे हे सहसा करणार नाहीत असे वाटते. याप्रे॥ संदेह प्राप्त होतात. तरी, याचा मजकूर कसा आहे तो मनास आणणे. त्याचा त्याचा बनाव न पडे ते करणे. सरदारांनीहि त्यास खोलून लिहिले असेल. आह्मी व सरदार एक जाहालियावरी याविशीं लिहून पाठऊं. त्यास सर्व प्रकारे सुजाअतदौला यांणी ईकडील लक्षा॥ करणे हे उत्तम. याच डौलावर त्यास राखणे. त्याचे मातुश्रीचे राजकारण तुह्मांसी आहे. तिकडनहि त्यांस बांध करवणे. वर्तमान लिहिणे. इटाव यथाल ठाणे कायम आहे. झंजत आहे. आतां ईकडील उपरामळे राहिल ठहरू पावणार नाहीतसे वाटते. ती त्यास हिंमत देऊन लिहिणं. ज्यांत दमधरी ते करणे. रामचंद्रभट पुराणिक यांस दोन तीन पत्रे पाठविली. परंतु त्यांचे उत्तर येत नाही. त्यास, ते कोठे आहेत, श्रीस गेले न गेले, ते सर्व लिहिणे. + जाणिजे. छ १९ सवाल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ १९७] ॥ श्री ॥ ४ जून १७६१. . अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्यराजश्री विसाजी गोविंद कमाविसदार. प॥ सागर दि॥ राजश्री गोविंद बल्लाळ मोसावी यांसि: