पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/423

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काईम राखणे. फौज प्यादे जमाव असून ईटाव्यासारखे ठाण्यांतील कमाविसदार पळतात, अपूर्व आहे !ठाणेदाराने मरावें तेव्हां निघावे. नजीबखान फौज थोडी. तोफखाना नाही. आह्मी चमेल पार जालिया तेहि माघारे फिरतील. तुह्मांकडे मातबर मामला. तुमची पत असोन आह्मांस ऐवज मिळेना ! बंगसीचे वेळेस बाबूजी नाईकानें पाईं पैजारा चढवून रु॥ कर्ज मेळविले. आतां सर्व अनुकूल असून न मिळे यांत परिच्छिन्न तुह्मांस शब्द लागेल. निकडीचे समयीं तरतूद न होई तर मातबरी काय कामाची ? सत्वर पांच लाख रवाना करणे. सर्व त्यापुढे समजावणे. तूर्त पांच लाख महिनाभरांत. दोहोंत आणखी दाहा लाखांची तरतूद करणे. छ मजकूर. बहुत काय लिहिणे. हे विनंति. सुजादौलाकडील सूत्र बळकट करणे की तिकड न जात. हे विनंति. ॥श्री॥ ४ जून १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः... पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. खासास्वारी नजीक चमेलकुवार नदीवर आली. येकादो दिवशी चमेल उतरून पलीकडे जाऊं. लौकरीच सरदाराची भेट होईल. हाफजीरहिमतखान आले आहेत. त्याचाहि जाबसाल २८२ महमदखान बंगसावर बाजीरावाने १७३३ त स्वारी केली. ती छत्रसालाच्या विनवणीवरून केली. त्यावेळी बुंदेलखंड मराठ्यांच्या हाताखाली आले नसल्यामुळे आसपासचे सावकार व जमीदार यांजकडून पैसा मिळण्याची अतिशय अडचण असूनहि बाजीरावाचा हस्तक जो बाबूजी नाईक त्याने पाई पैजारा चढवून कर्ज मिळवून दिले आणि आतां सर्व सोई असून गोविंदपंताला ऐवज मिळेना. तेव्हां भाऊसाहेबांच्या मनांत गोविंदपंताविषयी राग आला तो यथान्याय आहे. २८३ बाबूजीनाईक बारामतीकर.