पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/422

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. खासास्वारी आज छ १७ सवालीं ग्वालेरीहून कुच होऊन पुढें आगऱ्याकडे जावयास दर कुच चालली. पांच चार दिवसां सरदाराची भेट होऊन पुढे नजीबखान व जाहानखान वाढोन आले आहेत त्यांचे पारपत्याची तजवीज होऊन येईल. सर्व गोष्टी बन्य होऊन येतील. तुह्मी आपलेकडील तमाम ठाणेदारांस ताकीद करून, ठाण्यांठाण्यांत दम धरून कायम राहात निकड पडल्यास चांगले. त-हन जुंझत, ऐसें करणे. केवळ दुरील अवाईने ठाणी टाकून पळोन जातात ऐस नसावें. जो ठाणे टाकून अवाईनेच येईल त्याचे पारपत्य तुह्मीं उत्तम प्रकार करावें; ह्मणजे दुसऱ्या ठाणेदारांस असें वाटेल की ठाणे टाकून गेल्यान अबरू राहत नाहीं; तेव्हां ठाणे टाकून निर्धू नये, जुझून. मरावे हेच आहे. अबरूने दम धरून राहून जुझतील तेव्हां इकडीलहि कुमक चांगला पोहचन शह वारेल. त्याजपाशीं तोफखान्याचीहि ईबारत नाहीं, ऐस आहे. तरी याप्रमाणे सारे ठाणेदारांस ताकीद करणे. बंदोबस्त ठीक राखण. वरिचेवरी वर्तमान सर्व लिहित जाणे.+ चमेल ढवलपुराचे खाली चार पाच कोशी उतरून सरदारांकडे जाऊं. यमुनेस उतार जाहाल्यास नजीबखान वाढला आहे त्याचे पारपत्य करणे हेच काम आहे. मुख्यत्वे मोठे पार जाहालियावरी ठाणीठुणियांचा बंदोबस्त उत्तम प्रकारे होऊन यइल. तूर्त आपल्या जागा मात्र खबरदार राखणे. असहि करितां एखाद जागा ठाणियास पेच पडला तर कांही चिंता नाही. परंतु थोडी फौज पाठवून कामाह नाहीं, येथेहि नाही, असें नसावें. याजकरितां पाठवीत नाहा. अगरियाचे सुमारे जाणे जाहाले झणजे या दबदबियाने ते सर्व येकत्र होतील, तिकडे राहाणार नाहीत असहि वाटते. वरचेवरी बारीक मोठं वर्तमान बातमीचे सर्व लिहिणे. जाणिजे. छ १७ सवाल. चवथे रोजी चमेल पार होऊ. सरदारहि मथुरचे सुमारे येतील. मग सर्व मिळोन पार यमुना होऊं अगर तुझांकडे फौज पाठवणे तरी पाठवू. तोपर्यंत ठाणीं २८१ भाऊसाहेबांना शिंदेहोळकर मथुरेचे सुमारे भेटले. "