पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/421

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तूद करोन ईटावें राखणे. पंधरा रोजांत सर्व फौजा एक होऊन फडशा होईल. तुमची वारंवार बातमीची पत्रे आली ती पावली. उत्तरोंहि वरचेवर येथून गेली आहेत. सुजादौला तूर्त निकाल पाडून गेले. उत्तम. फिरोन अलीकडे गोहर येऊन त्यांकडे न येत, ईकडील सूत्र मजबूत राही ते करणे. छ १४ सवाल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ १९४ अ.] ॥ श्री ॥ ३० मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो॥: पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. प॥ जलालीबिजराम व कसबे कासगज येथील कमाविस राजश्री अंताजी मणिकेश्वर यांजकड आहे ती त्यांजकडून दूर करून माहाल सरकारांत ठेऊन तुझांस जप्ती सांगितली असे. तरी सनद पावतांच सदरहरें॥ महालची जप्ती करून ऐवज सरकारांत जमा करणे. जाणिजे. छ १४ सवाल सु॥ सितैन मया व अलफ. हे विनंति. [ १९५] ॥श्री॥ २ जून १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून २८० अंताजी माणकेश्वरावर नानासाहेबांची इतराजी पैशाकरितां पूर्वापासून होतीच [ पत्रे व यादी ३३७ ]. ही पैशाकरितां इतराजी भाऊसाहेबांच्या सांगण्यावरून झाली असली पाहिजे हे उघड आहे. पूर्वी दादासाहेबांकडून अंताजीपंताचें पारिपत्य व्हावे तसे झाले नाही. आतां खुद्द भाऊसाहेब हिंदुस्थानांत गेले. तेव्हां अंताजी माणकेश्वरासारख्यांचा मुलाहिजा ह्यापुढे राहणे दुरापास्त होते.