पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/420

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९५ [१९४ ] ॥श्री॥ ३० मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. ठाणे इटावें येथे तुझांकडून पदमसिंघ चौधरी राहातो. त्या ठाणियास रोहिल्याची फौज येऊन वेढा घातला आहे ह्मणोन परस्पर कळलें. ऐशियास, तुह्मीं त्याचं साहित्य करून बंदोबस्त केलाच असेल. खासा स्वारीहि आज छ १४ साली ग्वालेरीस येऊन दाखल जाहाली. येथून दरकुच तिकडे येऊन सर्व गोष्टी उत्तमच होतील. ठाणेदारांस धीर भरंवसा देऊन दमानें राहे ते करणे. पेशजी तुह्मांस ऐवजाकरितां लिहिले आहे त्याप्रे॥ कांहीं ऐवजाची ततूद जरूर होऊन येई तें करणें. बातमीचें वर्तमान वरचेवरी जलद जलद लेहून डाकेबराबर पाठवीत जाणे. हाफीजखान, गंगाधरपंत मथुरेस आले. तोहि प्रकार कसकसा होतो तो कळेल. आमीहि आग्रयाचे सुमारे जाऊन अबदालीचें पारपत्य करूं. ईटाव्याच्या ठाणेदारास बहुत प्रकारें धीर भरंवसा देऊन ठाणे चांगले त-हेनें कायम राहे ते गोष्ट करणे. य+मुनेचे अंग मोकळे आहे. बेहेडौँ थोर आहेत. कुमक पावती करोन ठाणे न जाई तें करणे. ठाणे मजबूत. तुमचा बदोबस्त. रोहिले दहा हजार फौज आहे, तोफा नाही. उगेच आवाईने ठाणी पळतात. हे कामाचें नाहीं.बहुत तर___ २७८३० मे १७६० ला भाऊ ग्वालेरीस आले व तेथून त्यांनी कुच १७ सवाली ह्मणजे २ जून १७६० ला केलें ( लेखांक १९५). ४ जूनला भाऊ चमेलनदीच्यातीरी ( लेखांक १९६ ) व ८ जूनला ढवलपूरपासून चार कोसांवर उत्तर तीरीं आले [ लेखांक १९९ ]. शिंदे होळकर व जाट यांची सैन्ये भाऊसाहेबाला २५ जूनच्या अगोदर दोनचार दिवस येऊन मिळाली. नजीखान व जाहानखान यांनी इटाव्याला शह दिला होता. त्यांना हुसकून लावण्याकरितां ८ जून पासून १२ जुलैपर्यंत चमेलउत्तरतीर घ आग्रा ह्याच्या मधील प्रदेशांत भाऊसाहेवांस राहणे भाग पडले. चमेलउत्तरतारापासून आग्रा कायतें आठरा कोस होते. दोनचार दिवसांत आग्रयास जाऊन पोहोचूं ह्मणून भाऊ गोविंदपंताला लिहीतहि होते. २७९ नाले यांच्यामुळे झालेली खोल दरड [ पत्रे व यादी १६२ ].