पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/419

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. लिहिले वर्तमान सविस्तर कळों आलें. ऐशियास, एतद्विशींचा सर्व अर्थ तीर्थरूपांनी लिहिला आहे त्यावरून कळेल. खासास्वारी मजल दरमजल ग्वालेरपर्यंत आली. लौकरीच चमेल उतरून आगन्याचे रोखं जाऊं. तिकडील सर्व वर्तमान वरचेवरी लिहीत जाणे. जाणिजे. छ १३ सवाल सु॥ सितैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणे. हे विनति. [ १९३] ॥श्री॥ २९ म १७६० ___राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि: विनंति उपरि. काशीच्या ब्राह्मणांस वर्षासनाचा ऐवज चार पांच साला पावत नाहीं ऐसा बोभाट येतो. त्यास, येविशींचें वर्तमान कसे काय तें सविस्तर लेहून पाठवणे ह्मणोन पेशजी तुह्मांस लिहिले होते. त्याचा जाब आला की ऐवज पावोन दीक्षितांची कबजे घेतली आहेत. ऐशास, या।। असोन वारंवार बोभाट येतो हे काय ? याउपरि तुह्मांकडून ब्राह्मणांचा ऐवज कोण्हे सालांत कसा पावला आहे त्याची कबजे असतील ती हुजूर पाठवणे व बाकी राहिली असेल तेहि तपशीलवार लिहिणं. जाणिजे. छ १३ सवाल, सु॥ सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. सलामकीची आहेत. विश्वासरावाने आपल्या दक्षिणेतील मित्रांना पत्र पाठविली असावी. शिंदखेडच्या मोहिनेत विश्वासरावावरोवर बाबूराव राम फडणीस होते. तेव्हां मोरोबादादांच्या दप्तरांत त्या मोहिमेसंबंधी पत्रे सांपडावी. परंतु सध्यां तें दप्तरच मालकांच्या हलगर्जीपणामुळे नाहीसे झाले आहे. उदगीरच्या ब पानिपतच्या मोहिमांसंबंधी विश्वासरावाचा पत्रव्यवहार पेण येथील कोल्हटकरांच्या येथें सांपडावा. विश्वासरावाचे मित्र कोणकोण होते ह्याचा बखरीतून किंवा इतरत्र कोठे पत्ता लागत नाही. - २७७ गोविंदपंताविरुद्ध हीहि तकार ध्यानात ठेवण्यासारखी आहे.