पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/418

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुजाअतदौला याचा प्रकार तपशीलवार लिहिला की वजिरी द्यावी व अलीगोहर पातशा करावा, याविशीं निश्चयपूर्वक लिहिलें यावें ह्मणजे याचा गुंता नाही, होऊन येतो, ह्मणोन. तर याचा जाबसाल तुझी पहिला तुह्मी बोलत होता त्यास वाकीफ आहां. दुसरे कोण्ही मातबर यासारिखा असल्याखेरीज बंदोबस्त व्हावयाचा नाही. व शाहाजादाहि आणावा येविसी वारंवार लिहिली गेलीच आहेत. दुसरा विचार सुजाअतदौलानें न करितां यावें हेंच उत्तम आहे. तुह्मीं या॥ करणे. कदाचित आमचा पका दस्तावेज गोऊन मग यावे हा प्रकार मनांत आणून जाबसालावरी घालतील तर न घालावा. आह्मी लौकरीच सरदारांजवळ जाऊ. भेटी होतील. त्यांणीं जाबसाल काय कसा केला तो पुर्ता समजोन तुह्मांसहि लेहून लोकरीच पाठवितो. परंतु त्यांणी लवकर यावें, शत्रूचा पराजय करावयास सामील व्हावे, हेच उचित आहे. + त्याचे वजिरीचा मजकूर पहिलाच आहे. तुमीच बोलत होता. आतांहि मातबरावांचून बंदोबस्त होणार नाही. त्यांणी घरचे काम जाणून सत्वर यावें. मोठे काम जालिया त्याचे हातें इछित काम होईल. याचा निश्चय, पांच सात रोजांत सरदार जवळ होतील, मग लेहून पाठऊ. लक्ष्मीनारायणाचे हातें सरदारांनी निशा पाठविलीच असेल. ॥ छ १२ सवाल. बारीक जलद बातमी दररोज येई असें करणे. नजीबखान काय तजबीजेत ? पैकियाचे तगाद्यामुळे पाय काढला अशी खबर आहे. ठीक आणून लिहिणे. ठाणी खबादार राखणे. हे विनंति. [१९२] ॥श्री॥ २९ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ विश्वासराव बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून २७६ विश्वासरावाची दहापांच पत्ने आमचेजवळ आहेत. परंतु ती बहुतेक अलेकम