पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/417

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९२ [ १०० ] ॥ श्री ॥ २३ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः - पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणे. विशेष. राजश्री शामजी रंगनाथ यांस सुजाउद्दवले यांजकडे र॥ केले आहे. तरी हे तेथपर्यंत सुरक्षित पोहोचत तें करणे. पेशजी तुझांस बुंधेले सरंजामसुद्धां सत्वर येऊन सामील व्हावे, दारुगोळ्याचा सरंजाम करून पाठवावा व ऐवजाची तरतूद करून पाठवून द्यावा, याविशी लिहिले होते. त्याप्रमाणे ततूंद करून सत्वर दारूगोळा व ऐवज सत्वर येई ते करणे, व बुंधेलहि जमावसुद्धा जलद येऊन पावत तें करणे. र॥ छ ७ सवाल. + बहुत काय लिहिणे. हे विनंति. - - - [ १९१] ॥श्री॥ २८ मे १७६.. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. तुझी पत्र ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेचे पाठविलें तें छ १० सवाली प्रविष्ट जाहाले. त्यांत अबदालीची लष्करची बातमी तपशीलवार लेहून पाठविली व कितेक मजकूर लिहिला तो सर्व कळला. त्यास, याच प्रकारें बारीक मोठे वर्तमान लिहिणे. प्रस्तुत वर्तमान आहे की माघारा जाणार. अफीज रहिमतखान मथुरेस जाटासी बोलावयास आला आहे. गंगोबासहित जाटहि गेला आहे. काय होईल तें लेहूं. जाहानखान व नजीबखान ईटावेकडे गेले ह्मणोन खबर आहे. त्याचाह वर्तमान लिहिणे. २७५ पुढे लवकरच सुजाउदौला मिळाला नसता तर अबदाली बहुशः माघारा गेला असता. सुजाउदौल्याची मातबरी भाऊ व अबदाली दोघेजण जाणत होते (पु. ढील वाक्ये व काशीराजाची वखर )..