पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/416

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंधेले वगैरे ग्वालेरीस ठेवावे ह्मणोन तर पाहारीनजीक येतो. तेथन पुढे येतेसमयीं हाहि प्रकार करणे तसा करूं. ऐवजाचा बोभाटच लिहिला तो खराच आहे. परंतु तूर्त वोढ आहे. बेगमी खर्चाची तुझींच तजवीज केली पाहिजे. पेशजी लिहिलेप्रमाणे करणे पांच सात सत्वर येऊन पावेतसे करणे. रवाना छ ३ सवाल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पैवस्ती छ १० सवाल. [ १८९] ॥श्री॥ २१ मे १७६० राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसिः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. राजश्री शामजी रंगनाथ यास सुजातदौला याजकडे वकीलीस पाठविले आहेत. त्याजबरोबर निसबत नारायणराव बापूजी याजकडील स्वार दिल्हे आहेत. त्यांस रोजमरा आठवडा रुपये. २५ स्वरुपजी मुळे स्वार १० HILIBRARY KAP ४७॥ कानोजी हरपले १९ १२॥ लक्ष्मण बाबाजी ५ - -- एकूण ३४ चौतीस स्वारांस रोजमरा आठवडा रुपये पंच्याशी याप्रमाणे, महिन्याचे आठवडे चार, जोपर्यंत मशारनिल्हे कामकाजास तेथे राहतील तोंपर्यंत सदरहप्रमाणे रोजमरा प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजी देत जाणं. + जाणीजे. छ ५ सवाल सु॥ सितैन मय्या व अलफ. बहुत काय लिहिणं. हे विनति.