पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/415

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१८८] ॥ श्री ॥ १९ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. + सुजाअतदौला सर्वप्रकारे आपलेकडे येणार, आपण जलदीने यावें, हणजे येऊन मिळतील, तिकडे जातच नाहीत, ह्यणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास सुजाअतदौलाचा सर्व प्रकारे दुसरा विचार नाही, आणि हल्ली तुमचे लिहिल्यावरून व त्याचे पत्र आले त्याजवरून फारच खातरजमा जाहली. आहीं मालनास आलो. दरमजल पाहारीवर येऊन पुढे सरदारांस सामील होतो. राजेरजवाडे येतील ते घेऊन येतो. तुझी सुजातदोलाशी बोलोन सर्व पक्के करून एकपक्षी करणे. आग्रियाआलिकडे सरदारांची गांठ पडतांच त्यांचेंहि येणे व्हावें हें जरूर व्हावें. हल्ली त्यांस पाठविलें असें तें देणे. तुझींहि लिहिणे. मजबुदी पक्की करणे. त्यास इतकेच लिहिले असे की तुह्मीं स्नेहाचे रीतीने फार चालत आला. पुढे जे उचित तेच करावें. तुह्मीं त्याशी कितेक मंत्र भेदपुरःसर उपयोग जाणून बोलावयाचे बोलणे. तें प्रस्तुत ते तिकडील पक्षीच आहेत. उगाच राबता अमावा. हाफीद रहमदखान यासहि पत्र लिहिले आहे. देणे. दोनी पत्रांचे मसुदे पाठविले आहेत. हाफीज रहमतखान बंगस फुटतील तर फोडावे. प्रस्तुत यमुनेपार अंमल त्याचाच आहे. तुमची ठाणी जी काय आहेत ती आहेतच. त्याचा बंदोबस्त करून तुह्मीं सत्वर चमेल खासा स्वारी उतरलियावरी हुजूर येऊन फौज सुद्धा मिळणे. बुंधेले वगैरे काहीं तुमची फौज चमेलतीरी हुजूर सामील व्हावी. तुह्मींहि बनेल तरी यावें. अगर सुजादौला तुह्मी मिळोन दरमजल यावें. तिकडे काम नाही. येथे मोठे लढाईस सामील नाहीं असें न होई तें करणे. तुमची डांक असून रोज खबर येत नाही असें कामाचें नाही.