पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/414

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८९ एकपक्षी होऊन मोठे काम हे करावें:-चकत्याची पातशा कायम करावी. हेच आह्मांस त्यास योग आहे. याउपरि जलदी करणें हेंच लायक आ(हे). माधवसिंगाचा दंगियाचा वगैरे सर्व प्रकार कळला. त्यास हा प्रकार खराच. परंतु इतकेंहि सोडून निखालस होऊन येतात. असे जाहल्यास मागील रफेदफे करून त्यासहि भेटीस बोलवावें हेच केले असे. येतात न येतात हेहि कळेल. परंतु त्यास अबदालीचा भरंवसा पु (र) त नाही. इकडे नीट वर्तत नाही. याउपरि सर्व समजून नीट जाहलें तर बरेंच आहे. फार करून होतीलच. अंतर्वेदीतील अम्मल जबरदस्तीने राखिला तसाच राखावा. आमचे येणियाची आवाई तेथे गेलियाने ते घाबरे होऊन आपला देश जवळ करावयाची तजवीज करीत असतील. त्यास, याची बातमी बारीक बारीक तुमची डाक बसली असे तिकडून वरचेवरी आणून लेहून पाठविणे.+ सुजादौलाविसी दुसरा प्रकार न होई इतकेंच करणे. हेच जरूर आहे. सुजादौला पुरते आपले होऊन कुमकेस यावें. काम जालियावर त्याचे हाते मोठे काम घेऊ. मळमळीत असले तरी घरीच राहावें. तिकडे न जावें. हे तरी व्हावें. आबदलीचे लष्करांत तुमची बातमी गेलीच आहे. चहूंकडील बारीक खबर राखून लिहिणे. हिंदूपत वगैरे बुंदेले व कांहीं प्यादे व ऐवज खर्चास हरतरतूद करून जरूर पाठवणे. आम्ही सुरोंजेहून नरवरावरून जातो. पुढील सरदारांचे लिहिलेप्रमाणे ढवलपूर अगर करोली ग्वालेरकडून जाऊं. अहिरांनी लबाडी केली. वाट चालत नाही. आम्ही पढे गेलों. आतां नरवराकडेहि नीट वाटेनें पत्रं येत जाईसें करणें. बंगालियाकडील खबर राखोन लिहीत जाणे. बुंदेलेयाचे सामान आपला कोणी प्यादा देऊन सत्वर येईसें करणें. तुझी ठाणी, मुलूखं, काईम राखणे. दुवाबानें अबदाली माघारा चालला तर तुझी त्या मार्गेच मागें येणें. खातरजमा बंदोबस्ताची असेल तरी फौजसुद्धा तुह्मीं चमेलकाठी येणे. हे विनंति. पै॥ मित्ती ज्येष्ठ शु॥ ८. ENERAL UPRATI,पै॥ मित्ती सार्वजाने कामाला खेड, (पु.)