पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चुद्धिभेद करून माघारें कुच करवावें; आपण निराळं व्हावें. यांत ते वाचून अबदालीनजीबखानांचें पारपत्य होईल. ते निष्ठा राखितात. यास्तव त्यांस सूचना असावी. करतील तर उत्तम. न करतील तर सरदार जाट आह्मी एक जाहालियावर त्यांस पुर्ते भारी आहों. परिणाम त्यांणी आपला पहावा. नजीबखान तर मूलच आहे. त्याचे बोलणे प्रमाण नाही. बातमी जलद पोहोचावणे. बुंधले वगैरे फौज ऐवज सत्वर पाठवणे. ॥ छ २७ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ १८७] ॥श्री ॥ .. १५ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. तुझी पत्र पाठविलें तें पावलें. रामगड जायाचा घेऊन पुढे अंतर्वेदीत अंमल करणार ह्मणों तर मजलदरमजल आमा सिरोजेस आलो. याउपरि ग्वालेरीवरून ढवळपुराचे सुमारे येतो. राजेरजबाडे यांस पत्रे गेली आहेत. बुंधेल्यास गेलींच. तेहि जमा होतील. मातबर फौज व तोफखाना गाडदी व दोन्ही फौजा सरदारांच्या व जाट इतके येथे गाडून उभे राहून चालून घेऊन तेव्हां अबदल्लीच्याने दम धरून उभे राहणे तोफाचे माराखालीं बार येणे कळतच आहे ! सुज्याअतदौला सर्व प्रकार स्वामीची फत्ते इछितात ह्मणोन लिहिले, तर हेंच त्यास योग्य आहे. त्यांचा आमचा स्नेह तसाच आहे ! आह्मीं जवळ आलियावरी ते येऊन सामील होणार. त्यांस करणे उचित आहे. सरदारांनी वकील त्यांजकडे त्यांची निशा व्हावी ह्मणोन पाठविले आहेत. त्यास, तेहि पोहोचले असतील. तुह्मांसहि विस्तारें लिहिणे ते लिहिले असे. याउपरि त्यांणी उलग न राहतां,