पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/412

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ १८६] ॥श्री ॥ १४ मे १७६०, पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि : विनंति उपरि यमुना पार लष्कर उतरावे लागते. यास्तव तुझीं अंतरवेदीतून नावा कुल जमा करून एक जागा कोण्हाचा उपद्रव नावेस न लागे ऐसें ठिकाणी ठेवणे. खासा स्वारी पुढें आलियावरी आज्ञा होईल त्या स्थळी आणायास येतील. + तुमच्या जिल्ह्यांत असतील त्या कुल दक्षणतीरी आपलें जबरदस्तीखाली जमा करणे. वरचेवरी बातमी वर्तमान लिहीत जाणे. खासा स्वारी अरूण प्रांतखेची येथे आली. दरमजल नरवरच्या सुमारे ढवलपुरचे घाट उतरोन गिलच्याचे पारपत्यास जातो. हिंदुपत वगैरे बुंदेले लौकर येत तें करणें. पैका जरूर पेशजी लिहिलेप्रमाणे पाठवणे. या कामास विलंब आळस न करणे. जाणिजे. लिहिलेप्रे॥ सारा एवज तयार करणे. तूर्त पांच लाख जरूर पुढे ग्वालरी सुमारे पाठविणे. हिंदुपत वगैरे पत्रे फार दिवस गेली. सारे सत्वर पंधरा रोजांत येऊन पावतसे करणे. सुजाअतदौलाचे उत्तर आह्मांकडे येतों असें आले. परंतु पुता भाव शुद्ध पाहून लौकर येतसे करणे. रोहिल्याकडे तुमची डाक बसलीच आहे. फौज कोणे सरदारांची किती ? रमजान झालियावर उमेद कोणता । सडे कसे जाले ? बहत जलद दो रोजाआड आह्मांस बातमी यइस करण. जयनगरवाले याचे सरदाराचे प्रस्तत फारच बिघडले आहे. निष्ठेचे गाडाह लिहितात. एकपक्षी पर्ते जाले तर निखालसता करोन आणू. सर्वांस बुधले याचा भरंवसा फार. ते सत्वर येतसे करणे. भुपाल खेचीकरहि येणार. अहीर वगैरे लबाड्या सर्वांनी मांडल्या. बंदोबस्त करून जाणे. पुढील लौकर जाणियास ठीक पडत नाही. कार्याकारण करणें तें करून पुढे जातो. नजीबखान तो अबदालीच आहे. त्याखेरीज वरकड रोहिले फुटतील तर फोडावे. महमदखान बंगस याची निष्ठा तुह्मी फार लिहीत होता. ते प्रस्तुत जाऊन तेथे मिळाले. तेहि येथील स्नेह राखतात. त्यांणी व हफीज रह- . मतखान पहिले रुजू होते त्यांणी अंतस्थ इकडील आश्वासन घेऊन त्याचा