पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/411

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| समयावर दृष्टी देऊन वर्तणूक करून ज्यांत सरकार काम तें करणे. मु॥ इहिदे सितैन मैय्या व अल्लफ. ॥ छ २४ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. मोर्तबसुद, बार. [१८५] ॥श्री॥ १४ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजेश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिःपोण्य सदाशीव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशळ जाणोन स्वकीय कुशळ लिहीत जाणे. विशेष. चितपावन कन्हाडे यांचा कजियाँ श्रीत ४ लागला आहे. आतां फारच वाढला असे. त्यास, परस्परें कजिये वाढून एक प्रकार दिसावे हे नसावें. त्यास, जिकडून वाढला असेल तिकडून निराकरण करावे. यास्तव लिहिले असे. त्यास इतके वाढावयाचे कारण काय ? आतां तट कोणे गोष्टीचा पडला आहे तो लिहिणे. येथूनहि लिहावयाचे असेल तें लिहून पाठवू. तुहीं कहाडियांस लिहून कजिया न वाढून नीट होईल तें करणें. + वर्तमान कळलियावर दुतर्फा लेहून मोडून टाकावे. लागेल तर लेहून पाठवणे व तुह्मींहि हाच यत्न करणे की कलह न वाढे. ॥ छ २७ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे।। छ १२ सवाल. २७३ कज्याचे स्वरूप काय होतें तें कळते तर बरेंच अभ्यसनीय होते. __ २७४ काशीत. इतर अक्षरांपेक्षां श्री नीटनेटकी काढिली असून श्री आणि त यांच्यामध्ये योग्य असें अंतर ठेविलें आहे.