पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/410

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिंदे दंडवत विनति उपरि. अंतर्वेदीत ........ .......... यासी आज्ञा केली. त्यास तुझांपाशी श्रीमंताकडून हुजूरातची पथकें फौज होती ते उठोन गेली ह्मणोन तुमचे पत्र आले. त्यावरून हल्ली तुझांस लिहिले असे. तर रांगडे, स्वार, प्यादे, नवी शिबंदी, अगत्यागत्य प्रसंगानुरूप लागेल तशी गुजरशीने ठेवून अंमल कायम करून, सरकार काम करणे. चर्च शिबंदीचा लागेल तो मनास आणून मजूरा दिल्हा जाईल. सु॥ इहिंदे सितैन मय्या अल्लफ. जाणिजे. छ २४ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. PRILLIR. 77 श्री शाळकांत चरणीं तत्पर. खंडोजी सुत मल्हारजी होळकर. बार GENERAL [ १८४] ॥श्री॥ ११ मे १७६०. राजश्री बाळाजी गोविंद गोसावी यांसि:अखंडितलक्ष्मीआलंकृतराजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर व जनकोजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. विशेष. बुंदेलखंडा बकशी व सुमेरसाचा पुत्र रतनसा यांणी दंगा केला. त्यांस आपले मायेंत घेणे. प्रसंगानुरूप कांहीं अगत्याअगत्य खर्चवेच लागला तर समयावर दृष्टी देऊन करणे. बुंदेलखंडाचे ऐवजी मजुरा पडेल. त्याजला हाती घेऊन तूर्त समाधान करून हाती घेणे. याची पुढें दिक्कत पडेल. यास्तव अनमान करून नुकसानी कराल, ऐसें सर्वथा न करणे. प्राप्त २७२ बुंदेलखंड, आहिरवाडा, खेचीवाडा, रजपुताना, अंतर्वेद येथील बहुतेक राजेरजवाडे पेशव्यांच्या विरुद्ध होते,