पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ जाणोन स्वकीय लिहीत जाणे. विशेष. राजश्री पाराशर दादाजी यांच्या फौजेनें सीकस्त खादली, लुटली, नागवली, सिलेदार उठउठोन जातात, ह्मणोन राजश्री रखमाजी दादाजी यांणी विनंति केली. त्याजवरून हे पत्र तुह्मांस सादर केले असे. तरी मशारनिल्हेस हुजूर पाठवून देणे. जाणिजे. छ २० माहे रमजान, सु॥ इहिदसितैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. ॥ श्री॥ [ १८२] ८ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. सांप्रत तुह्मांकडून पत्र येऊन. वर्तमान कळत नाही. तुह्मीं कोठे आहां ? अंतरवेदीच्या अमलाचें वर्तमान काय ? सरदार कोण जागा आहेत ? रोहिले अबदाली कोणे ठिकाणी आहेत ? त्याजकडील वर्तमान येतच असेल तर सविस्तर लिहीत जाणे. +तुमीं पत्रदर्शनी चिरंजीवाजवळ येऊन सर्व हिशेब कच्चे यथार्थ समजावून कृपा संपादणे. कच्चे वर्तमान जलद सविस्तर लिहीत जाणे. छ २१ रमजान. बहुत काय लिहिणं. [ १८३] ॥ श्री॥ ११ मे १७६०. राजश्री बाळाजी गोविंद गोसावी यांसिःअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर व जनकोजी

  • हे दादोपंत वाघ ( धाकटे रामराजे यांचे चरित्र पृष्ठ १७ ) यांचे पुत्र असावे, २७१ टीप २६५ पहा.