पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/408

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८३ तसे सारे येक जागा होऊ. माधवसिंग दोहींकडे. राजकारण तिकडेच फार. आह्मांकडे येऊं ह्मणतात. बोलावू गेले. वरकडासहि पत्रे गेली. येतील ते जमा करीतच आहों. सुजादौलाचे काम ठीक करणे. वरचेवर बातमी चहूंकडील वर्तमान व अबदालीकडे बातमी ठेविली तेथील वर्तमान वरचेवर लिहीत जाणे. बाहेरील ऐवज तूर्त मिळणें नाही. खर्च भारी. लढाईचा प्रसंग ! पेशजी लिहिलेप्रमाणे दाहापासून वीस लाखपर्यंत तरतूद जरूर करणे. रवानगीचे हेच दिवस. लवकर तरतूद होऊन महिन्यांत ऐवज येईसा करणे. त्याकडील ल्याहावयाचा प्रसंग नाही. बुंदेले वगैरे तुमचे तालुक्याचे रजवाडे व प्यादे दोन तीन हजार नवे चांगले ठेवून पाठवणे. दारू व शिसें पंचवीस चाळीस खंडी जमा होईसें करणे. र॥ छ १९ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे॥ मित्ती ज्येष्ठ शुद्ध २ भृगुवार. मु॥ इनपामऊ नजीक शादार ? । [ १८१] ॥श्री॥ ७ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद व गंगाधर गोविंद स्वामी गोसावी यांसिः पोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल दारांचा होत असे. भाऊ येत आहेत हे त्यांना दोन तीन महिने माहीत होते. असे असून पुढे आग्रयास भाऊ पोहोंचले तेव्हां आपण खासा काय कारणास्तव आला ह्मणून मल्हारराव भरसभेत गों लागले ह्मणून भाऊसाहेबाची बखर लिहिणारा ह्मणतो तें बरेंच अविश्वसनीय आहे असे वाटते. जर किरकोळ सरदारांनी काम भागण्यासारखे असते तर भाऊ स्वतः खचित जातेना. अबदालीच्या हातून हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व सरदारांनी एकेकदां थप्पड खालली होती. तेव्हां भाऊंचीच वाट शिंदहोळकर पहात होते. अर्थात् होळकरांना भाऊंस कडक बोलण्याचे काहीएक कारण नव्हते. एकंदरीत बखरीत वर्णितेला हाहि प्रसंग अवास्तव आहे अशी जवर शंका येते.