पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/407

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ मलकाजमानी तेथे गेली आहे ह्मणोन वर्तमान आहे तिजला पत्र लिहिले असे. त्यास दोन्ही पत्रं तेथें पाठवावी. सुजादौलाचें सुजादौलास द्यावें. मलकाजमानी तेथे असेल तरी द्यावे, नाही तर न द्यावे. त्यास, सुजाअतदौला यास मुख्यत्वे हेच लिहीलें असे, की तुम्हीं अबदालीस साफ ल्याहावें आणि आम्हांकडे यावयाची तयारी करून यावें. पुढे एक होऊन अबदालीचे पारिपत्य करून पातशाहीचा बंदोबस्त तुमचे आमचे विचारेंच होऊन येईल. त्यास, पहिले वजीराचा प्रकार तुम्ही बोलत होता. त्याविशीं सरदारानेंहि त्यास उमेदवार करून वकील पाठविला असे. तुम्ही त्याचे अन्वयें त्याशी बोलावें. आणि सर्व प्रकारे त्याची निशा स्नेहाविशी करून दृढीकरण करावें. अबदालीस तिकडून साफ केलें. सुजाउद्दवलाचा भरंवसा तुटून ते निराश होत इकडे येतात हे केलें तें करावें. या समयीं तुमची कारीगारी काम करून दाखवावयाची हेच आहे. मलकाजमानी तेथे असेल तरी तीस हे पत्र देऊन तिचाहि भावगर्भ कळावा. अबदालीकडून राजकारणाची निराशा होऊन तीहि लगामी लोगेली तरी लावावी. परभारेंच या अन्वयें पत्रे सुजाअतदौलास गेली असेत. + आह्मीं सुरोंजेस आलो. अहिरांनी फार लबाडी केली. यास्तव कांहीं फौज पाठविली. खेचीकडे बाकीचे कांहीं उगवून दरमजल नरवरावरून पुढे जातो. वरचेवर सरदारांचे लिहिलें येईल २६९ मलकाजमानीने आपली मुलगी अबदालांचा पुत्र तैमूरशहा यास नजीखानाचे सांगण्यावरून १७५७ च्या मोहिमेंत दिली होती असें बखरकार लिहितो. तें खरें असतें तर मलकाजमानी सुजाउद्दवल्याकडे पळून न येतां आपल्या व्याह्याकडे निर्भयपणे गेली असती. दिल्लीची पातशाही तैमूरशाहास देण्याचाहि नजीबखानाशी तिनें करार केला होता ह्मणून भाऊसाहेबाच्या बखरीत मटले आहे ( पृष्ठ २७). परंतु, तैमूरशहास पातशाही दिल्यावर जिच्या संरक्षणार्थ तिने इतका खटाटोप केला ह्मणून बखरनवीस ह्मणतो ती बाबर चकत्याची पातशाही कायम कशी रहाती? हा विरोध इतका कांही स्पष्ट आहे की भाऊसाहेबाच्या बखरीतील २२ पासून २८ पृष्ठांपर्यंतच्या मजकुरावरती फारच संभाळून विश्वास ठेवणे जरूर आहे. २७० भाऊसाहेबांना सरदारांनीच मदतीकरितां मुद्दाम बोलाविले होते. भाऊ रस्त्यावर असतां कोणत्या मार्गाने यावे, कोणत्या न यावे ह्यासंबंधी पत्रव्यवहार भाऊंचा व सर