पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/406

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८१ [१७९] ॥श्री॥ २ मे १७६०. पु॥ राजश्रि गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिःविनंति उपरि. सुजाअतदौला राजकारणे चहूंकडून सोडून एक पक्षी होतात याप्रे॥ आढळले आणि इकडून त्याची निशा पडली पाहिजे, यासाठी तुमचेंहि जाणे जाहालियास जावें. त्याची निशा करावी. आणि त्यास भरंवसा पुरवून आपलें करावें. तुमचे जाणियास सोई नाही व इतबार न पुरें; तुझी सर्व त्या प्रांतीचे अकारीब, जावें न जावें; असें असल्यास कोण्ही शाहाणा इतबारी पाठवणे. लिहिल्याप्रे॥ सर्व करणे. जाणिजे. + मुख्य गोष्टी अबदालीकडे साफ जाहिराना व अंतस्थे कळवावें की आह्मी हे एक जाहालों. व पुढे त्यांसहि पत्रे जाबसाल आमचे जाबसालाप्रे॥ जात जावे की हे तैमूरियाची पातशाही; याचा बंदोबस्त कळेल तसा आह्मी राजश्रीपंतप्रधान याचे इतफाकाने करूं ; तुझी या गोष्टीत न पडावें आणि रोहिल्यामुळे हावभरी न होणे; पुढे भारी पडेल याचा पूर्ता विचार करणें, आमांस तरी तुमचें मसलतींत मिळणें नाहीं; या भावें त्यास कळवावें. आणि आपले फौजसुद्धां येऊन पोहचून शत्रूचे निराकरण होऊन येई ते करावें. बंदिजफते दिल्लीतील पातशाहीचा बंदोबस्त त्याचे आमचे विचारें होऊन येईल तोच केला जाईल. जाणिजे. छ १५ रमजान. हे विनंति. [१८०] ॥श्री॥ त॥६ मे १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार. विनंति उपरि येथील जाणोन स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. सुज्याअतदौला यास येथून पत्र लिहिले असे. व २६८ जय झाल्यानंतर.