पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/405

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० [१७७ ] ॥ श्री ॥ २९ एप्रिल १७६०. पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिःविनंति उपरि सरकारांत गुलाबाचे प्रयोजन आहे. तरी भागिरथीच्या पाण्याचा गुलाब चांगला एक मण, वरकड गुलाब चार मण, एकूण पांच मण गुलाब चांगला बहुत बेश पाठवून देणे. + रवाना छ १२ रमजान. हे विनंति. शंभर जेजाले व दोनतीनशें बंदुका खरेदी करोन सत्वर पाठवणे. हे विनंति. - [१७८] ॥ श्री॥ २ मे १७६०. प॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांस: विनंति उपरि तुझीं अबदालीच्या लष्करांतून बतिमी यावयाची तजवीज केली. ते फार उत्तम केले. या उपरि तिकडील बातमी रोजचेरोज कच्ची लिहून यावी. त्यास येथें आलियावरी पैका काय मिळाला ? व ब. राबर खर्च त्याचा किती आहे ? खासा फौज त्याचे देशची किती ? कोण कोण सरदार ? किती जुमलेदार ? नजीबखान व रोहिले वरकड किती ? पायाचे माणूस किती ? तोफा किती ? कशा आहेत ? सेर जाहले, बुणगे लाविले, ते कोठे गेले ? याची काय तजवीज आहे ? मुलकांत अम्मल कोणत्या जागा कसा आहे ? हे कुल वर्तमान बारीक बारीक कळावें असें जरूर करणे. सेट्याजी खराडे याचे पुत्र व आनंदरावराम याची खबर आहे की जिवंत सांपडले आहेत. त्यास तुमी त्याचा शोध तेथें करवून हे कोठे आहेत ! कसे आहेत ? तेंहि बातमी कळे असें करणे. जाणिजे. छ १५ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. २६७ गणेश पंडित ह्मणून कोणी अबदालीचे सैन्यांत पेशव्यांचा बातमीदार राजरोस रहात असे, असें काशीराज लिहितो.