पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/404

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७९ सरकारांत प्याद्याचे प्रयोजन आहे. तरी तुझी चांगला प्यादा मर्द माणूस याप्रे॥ ३००० तीन हजार सत्वर हुजूर पाठविणे. एक महिना प्याद्यास तेथें खर्चावयास देऊन रवाना करणे. बराबर कारकून देणे. येथें आलियावरी माणुस पाहून करार केले जातील. तरी प्यादे दिरंग न लावितां पाठवून देणे. माणुस केवळ कमाविसदारी तहसीलच्या कामाचें असें न ठेवणे. चांगले मर्द झुंजाचे उपयोगी पडे याप्रे॥ तलाश करून ठेवून पाठविणे. + जाणिजे. छ ११ रमजान, सु॥ सितैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणे. वहिली व सागरपैकी हजार पाठवणे, ऐसी पत्रे येथून पाठविली आहेत. तोफखानासुद्धां भारी जमावाने लढाई करावी लागते. बाहेरील कुमकेयाचा भरंवसाच आहे. सुजादौला, फरुकाबादवाले अनुकूल होत असें राजकारणहि करणे. हिंदूपत वगैरे बुधेले जलद येत व चांगले प्यादे सागर, रहिली वगैरे तुमचे आढळाचे, अंतरवदीतील चव्हाण, आडारु वगैरे चांगले लोक प्यादे दोन तीन हजार पाऊण महिना पंधरा रोजांत येऊन पावतेसे करणे. तिकडे शह असल्यास तुझांस राहावे लागेल. शहाणें आहां. कांहीं फौज व नवे प्यादे ठेवून सत्वर पाठवणे. ऐवजाविसी प्रकार पेशजी लिहिला, तों अलीकडे तुमची पत्रे येतात त्यांत खराबीच लिहिली येती. असो. गारा वगैरे सर्वे आफत असली तरी दाहा वीस लाखांची तरतूद जरूर कर्ज अगर मामलतचे ऐवजी मिळोन सत्वर करणे. गैरहंगाम येणे. शत्रू प्रबल. बाहेरील ऐवज तूर्त कोठे आहे ? यास्तव जरूर तरतूद करणे. तपशील लेहून न पाठवणे, कामाचे प्रसंगी जो तरतूद करील ते कामावर पडेल. हे विनंति. पे॥ छ ९ सवाल. चांगले लढाऊ लोक पाहिजे होते. ह्याचा किंचित् उल्लेख ऐतिहासिकलेखसंग्रहांतील नंबर २५.च्या सारांशांत केल्यासारखा दिसतो. हा सारांश ज्या तीन फुटकळ बंदावरून रा. खरे यांनी काढिला आहे ते सबंद छापिले असते तर कदाचित् बरें होतें.