पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१७५] ॥श्री॥ २८ एप्रिल १७६०.. राजश्रि बाळाजी गोविंद गोसावी यांसिः अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नेहांकित मल्हारजी होळकर दंडवत. विनंति उपरि तुह्मीं राजश्री मकाजी मिते व गंगाधर विश्वनाथ याजबराबर तोफा सुमारे ५ पांच व बैल सर ५९० पांचशे नव्वद पाठविले ते सरकारांत पावले असत. सु।। इहिदे सितेन, मयों व अल्लफ. रवाना छ ११ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ १७६] ॥श्री ॥ २८ एप्रिल १७६०. राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. लढाईचा मोर्दैमा आहे. याकरितां २६५ अजून इहिदेसितैन लागावयास अवकाश होता. लेखांक १७० तहि असेंच इहिदे सितैन ह्मणून ह्मटले आहे, इहिदे सितैन मय्या व अलफ हा आवीं सन आहे, दुसरा कोणताहि सन नाही. हा इहिदे सितैन चार जूनला सुरू होणार होता. तेव्हां २९ मार्चला व २८ एप्रिलला 'इहिदे सितैन ' ह्मणून ह्मणण्याचे कारण नव्हते; नुसते सितैन ह्मणावयाचें. तेव्हां आवीं, फसली व हिजरी ह्याखेरीज चवथा आणीक एक सन होता की काय? किंवा आर्वी सन मृगापासून न मोजतां चैत्रापासून मोजावयाचा असा नानासाहेबांनी व मल्हाररावांनी विचार केला होता की काय ? लेखांक १६४ हे वाळाजी बाजीरावाचे पत्र आहे. तें १४ फेब्रुवारी १७६० त ह्मणजे माघ अखेर लिहिलेले आहे. ह्या पत्रांत सितैन मय्या व अल्लफ ह्मणून स्पष्ट सन दिला आहे व सितैन मय्या व अल्लफ आर्वी सन आहे हे उघड आहे. त्याच्या पुढले पत्र, आह्मांला उपलब्ध असलेलें असें २९ मार्चचे आहे. तें चैत्रांत लिाहले आहे व त्यांत इहिदे सितैन ह्मणून साल घातले आहे. तेव्हां आर्वी सन मृगाला आडनीड सुरू होत असे तो चैत्राला सुरू करून शालिवाहन शकाशी जळता करून घ्यावयाचा असा पेशव्यांचा व होळकरांचा विचार होता असे दिसते. २६६ आहिरवाड्यांतील आहिरांनी दंगा केला होता. त्यांना मोडून काढण्याकरिता