पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/402

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७७ फौज व गोडैदी व तोफखाना बरोबर आहे. इकडील बुंधेले व संस्थानिक सर्व बरोबर जमा करून नरवरच्या सुमारे येतो. पुढे जिकडे सोई दिसेल तिकडे जाऊं. माधोसिंग व बीजेशिंग व काटेवाले राणाजी यांस सर्वांस पत्रं, वकील, पाठविले आहेत. सर्व इकडील तिकडील दोहीं राजकारणांवर आहेत. परंतु आमचे येण्यामुळे एक पक्ष धरून सर्व जमा होतील. याच प्रकारे त्यांसहि लिहिले असे. हे सर्व एक होऊन मल्हारबा, जाट यांसहित अबदालीचें पारपत्य करावे हाच विचार आहे. त्यास, तुह्मीं तिकडील बंदोबस्त उत्तम प्रकारें राखून तुह्मीं हुजूर यावें. हिंदुपत, खेतसिंग, व तिकडील धुमे चांगले माणूस सर्वहि जे उपयोगी ते जमा करून आणावें. त्यास, तुह्मांस तिकडील दत्तियाचे पेंचामुळे इकडे यावयास विलेना, तर तिकडील बंदोबस्त उत्तम प्रकारे राखणे. आण तुहीं आपले तरफेनें शहाणा कारकून मातबर हिंदुपतीकडे पाठवून त्यास फौजसुद्धा सत्वर हुजूर लावून देणे. वरचेवरी तिकडील वर्तमान लिहीत जाणे. जाणिजे. रवाना छ ११ रमजान. हे विनंति. हांडिया मुक्कामी पोहोंचले (लेखांक ६९ ). उज्जनीला जाऊन भाऊंनी सैन्याची गणती केली ह्मणून रा. नातू लिहितात. परंतु मधल्या रस्त्याने हांडियावरून सीहोरास गेल्यावर उतरेचा रस्ता टाकून पश्चिमेकडे उज्जनसि जाण्याचे काही प्रयोजन नव्हते. भाऊंच्या मनांत उज्जनीला जावयाचे असते तर ते खांडव्यावरून व मोरटक्यावरून इंदुराला येऊन मग उज्जनीला जाते. परंतु रजपुतान्यांतील पश्चिमेकडील रस्त्याने जाण्याचा त्यांचा बेत नव्हता; मधल्या रस्त्याने जाण्याचा बेत होता. २६३ गाडदी व तोफखाना यांचे महत्व भाऊंच्या डोक्यांत पूर्णपणे बिंचले होते. इंग्रज व फ्रेंच लोकांना वीस पंचवीस वर्षे झंजतांना पाहून कवायती पलटणीचे महत्व भाऊसाहेवाला पूर्ण कळून चुकले होते. भाऊंनी प्रथम मुजफरखानाला चाकरीस ठेविलें तें मुसाबुसीला १७५१ त ककडी नदीवर लढतांना पाहून ठेविलें. २६४ अखेरीस शेवटपर्यंत गोविंदपंत भाऊसाहेबाच्या सैन्याला येऊन मिळाला नाही हे पुढे दिसून येईल. सध्यां दतियाचा पंच मध्ये आला ! पुढे आणीकहि किती एक पेंच मध्ये आले!