पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/401

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आह्मांस तर चकतेयाची पातशाही राखणे. यासाठी अबदालीशी सलुख करणे नाही. आह्मी सरदार एक जाहालियावरी सर्व गोष्टी उत्तमच घडून येतील. या ऐशास यांणीहि सामील होऊन चित्तापासून सोबती व्हावें. ह्मणजे आह्मांस पुर्ता याचा भरंवसा जाहला. मागे बोलत होते तें निदर्शनास आले. न केलिया आमचा शब्द मात्र राहील आणि आमी तो श्रीकृपेनें थोडक्याच दिवसांत पोहचून शत्रूचे निराकरण करितो. सर्व हे प्रकार त्यांसी समंजसपणे बोलोन त्याचा निश्चय करून लेहून पाठविणे. जाणिजे. + मागे सरदारांनी त्याची स्थापनाच पठाणाचे वेळेम केली. आतां हिय्या वाढवून नेहमी आमचे होऊन सोबती लढाईस होतील तर पातशाहातचे बंदोबस्ताचे काम त्याचे हाते घेऊ. दोहीं डगरीवर असल्या आपले घरीच कामाचे. सत्वर बोलून उत्तर भावगर्भ लिहिणे. र॥ छ ११ रमजान. हे विनंति. [१७४] ॥ श्री ॥ २८ एप्रिल १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यातिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. अबदालीमुळे मुलकांत दंगा फार. फौज मातबर आली ह्मणजे दबावाने जाईल; अथवा राहीला तर मातबर झंज होईल. पन्नास हजार फौजेनिसी जलदीनें मदत जाहाली पाहिजे. ह्मणज इकडीलहि बंदोबस्त राहील ह्मणोन पत्र लिहिले ते कळले. एशियास, अबदाली हावभरी जाहाले आहेत. यामुळे फौजानें आव टाकला. त्यास, सांप्रत आह्मी सीहोरीस आलो. मातबर वजीर मोडला, पळाला असतां फिरोन फत्तेच्या मसनदीवर बसविला (पते व यादी १६२). १२६२ ह्मणजे आंबेपडदुराहून निघाल्यापासून, फार झाले तर, चवेताळिसाव्या दिवशी भाऊ सीहोरास पोहोंचले. बारा किंवा तेरा एप्रिलच्या सुमाराला नर्मदेवर