पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/400

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७५ [ १७३] ॥श्री॥ २८ एप्रिल १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिःविनंति उपरि. सुजाअतदौला मातबर फौज आलियावरी खामखा इकडे येईल अबदालीकडे जात नाहीं; ह्मणोन विस्तार लिहिला तो कळला. एशियाम सुजातदौला याचा व मल्हारबाचा पहिल्यापासून स्नेह आहे. त्यास येथंहि त्यांणी सेहच जोडला आहे. पुढेहि त्यास हेच पाहिजे की चकत्याची पातशाही व हे सर्व अमीर आहीं एक होऊन अबदालीस काढून द्यावे. त्यांणी त्यास साफ जाब द्यावा. आह्मीं यांणी एक होऊन ज्या गोष्टीने त्याजवर वजन पडून त्याचे पुर्ते पारपत्य घडें तें करावें. हे तुहीं शहाणिया माणसाबरोबर सांगून पाठवून त्यास सर्व प्रकारे इतबार येई ते करून त्याचा दुसरा विचार न राहतां एक पक्षीं होऊन येत ते करणे. सजाअतदौलाचे राजकरण एक पक्षी ठीक करून दाखविणे. हे गोष्ट या समयीं फार उपयोगी आहे. तुमी शहाणे, सर्व प्रकारें. त्यांशी राजकारण राखून आहां. त्याचा हाच प्रकार जलदीने होऊन यावा हेच चांगले. तर सविस्तर करणे व लिहिणे. अलीगोहर याजकडीलहि प्रकार लिहिला तो कळला. त्यास याउपरि त्याची पत्रे वर्तमान येईल तें लिहीणं. त्यांणींहि यावें. सुजाअतदौला ते तिकडून आह्मी इकडून सारे जमा होऊन एक होऊन येतों असें जाहलियावर मग अबदालीने काय करावयाचं आह? सर्व चित्तानरूप घडेल. या समयीं सुजाअतदौला यांणी स्नेहाची वृद्धि करावी हेच बरें आहे. २६१ वावराने स्थापन केलेल्या पातशाहीस चकत्याची पातशाही ह्मणण्याची गेल्या शतकांत चाल असे. मोगल लोकांत चकते ह्मणून एक कूळ असे त्या कुळांत बाबराचा जन्म झाला. हिंदुस्थानांत आल्यावर बाबराने ते आपले आडनांव केले. जसा अहमदशहा दुराणी, तसा बावरशहा चकते. चकते हा शब्द भाऊसाहेबाच्या बखरीच्या ९४ पृष्ठावर आलेला आहे. ह्या शब्दाची मांडणी इंग्रजीत Cughtai अशी करतात. पितपक्षाकडून बाबराचा संबंध तैमुरलंगाशी पोहोंचे, ह्मणून वावराने स्थापिलेल्या पातशाहीला तैमुरियाची पातशाही हीहि संज्ञा दिली जात असे. बाबराच्या मातृपक्षाचे आडनांव मोगल होते, ह्मणून वावराला व त्याच्या वंशजांना मोगल ह्मणतात.