पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/399

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जोडी बराबर सविस्तर लिहीत जाणे. + हिंदुपत वगैरे बुंदेले यांणी दारूगोळी वगैरे सरंजामानसी व फौजसुद्धां हुजूर चाकरीस यावेच हेहि करणे. जाणिजे. छ १५ शाबान, सु॥ सितैन मया व अलफ. तुझांकडील बातमी वरचेवर यावी ती येत नाही. तर जरूर डाक बसवून वर्तमान पाठवीत जाणे. जाणिजे. छ म॥ आह्मी दरमजल मधील वाटेने येतो. आठा रोजा नर्मदापार होऊं. सुजादौला, पादशाहाजादा, बंगालवाले, सर्व आपलियास अनकूळ होतेसें राजकारण करणे. खबर त्याची व सरदार व अबदाली डाक बसवून आठा रोजा आड पत्र येईसें करणें. ऐवज बाकी फार तुझांकडे आहे. जरूर वीस पंचवीस पाठवून देणे. छ १५ साबान. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे॥ छ १७ रमजान. [ १७२] ॥ श्री॥ ११ एप्रिल १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि: पोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. माघ वद्य पंचमीचें तुह्मीं पत्र पाठविलें तें चैत्र वद्य दशमीस दोन महिने पांच रोजांनी प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान साद्यंत अवगत जालें. याउपरिहि तिकडील वर्तमान सविस्तर वरचेवरी लिहीत जाणे. चिरंजीव राजश्री भाऊ व राव तिकडे गेले. त्यांजकडे तुह्मीं येऊन सर्व निदेदन करणे. इकडेहि वर्तमान लिहीत जाणे. जाणिजे. छ २४ साबान, सु॥ सीतैन मय्या व अल्लफ. पे॥ आषाढ वद्य ४. २६. ही वाट कोणती त्याचे विवरण मागे केले आहे.