पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/398

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुमचें हुजूर प्रयोजन आहे. तरी पत्रदर्शनी हुजूर येणे. हिशेबकितेबाचा गुंता आहे ऐसा पर्याय लावून राहाल तर गोष्ट कार्याची नाही. हिशेबकितेब तुम्ही तयार केले असिले, जलद येत असिले, तर बरोबर घेऊन येणे. विलंब आसिला तर तुह्मींच येणे. जाणिजे. छ ११ साबान. आज्ञाप्रमाण. [१७१] ॥ श्री ॥ २ एप्रील १७६०. राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिःपाण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुझांकडून पत्रे येऊन वर्तमान कळलें नाहीं तरी सविस्तर लिहिणे. खासा स्वारी मजलदरमजल त्या प्रांतें येत आहे. येका दो रोजी बेहोणपुरास दाखल होईल. तेथून पुढे दरकुच येणार. तुह्मांकडे बाकीचा ऐवज फार येणे ता पुढील रसदेचा मिळोन पंचवीस लाखाची तरतूद करून ठेवणे ह्मणोन पेशजी लिहिले आहे व हल्ली हे पत्र लिहिले असे. तरी पंचवीस लाखांची तरतूद सत्वर करून ठेवणे व पांच साहा लाख पुढे आह्मांकडे लौकर रवाना करणे. येविसी विलंब न लावणे. वरकड आपल्या ठाण्याठण्यांचा बंदोबस्त कसकसा आहे ? तिकडील मंडळीला इकडील लक्षानें कोण आहेत ? कोणाचे राजकारण कसे आहे ? किंवा सारेच तिकडे आहेत ? हें वर्तमान तपशिलवार लिहिणे. तुह्मींहि युक्तिप्रयुक्तीने राजकारण राखून जे इकडे नसतील ते हाताखाली घालणे. जलद २५९ ह्मणजे ४ एप्रिल १७६० ला बहाणपुराला भाऊ पोहचणार असें होतें. आंबेपडदुराहून भाऊ फाल्गुन वद्य १३ ला ह्मणजे १५ मार्च १७६० ला निघाले. तेथून निघून चार दिवस त्यांनी दोन कोसांवर मुक्काम केला. व तेथून निघून ४ एप्रिलला बहाणपुरास पोहचणार होते. ह्मणजे आंबेपडदुराहून ब-हाणपुरास आठव्या दिवशी न पोहोंचतां (नातूकृत महादजीचें चरित्र पृष्ठ ५८ ) वीस दिवसांनी पोहोंचले.