पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/397

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ दीलदिलासा करून तमाम नालबंदी दिली. पन्नास हजार फौज समागमें येत आहे. देशी श्रीमंत राजश्री दादासाहेब पंचवीस हजार फौजेनिशी राहिले. गंगथडी बालाघाट इतक्यांत राहणार. सलाबतजंग व निजामअल्ली एकत्र होते. बसालतजंग अदवानीकडे होता. तोहि येऊन त्यास भेटला. तिघे एकत्र आहेत. कलबुरगेयास जाणार होते. फौज त्यांची आहे ती आहे. लबाडी करावयास चुकणार नाहीत. याजकरितां देशी नेहमीं पंचवीस हजार फौज ठेविली. कर्नाटकांत विसाजी कृष्ण याजबराबर दाहा हजार फौज देऊन रवाना केलें. येणेप्रमाणे बंदोबस्त ठीक केला आहे. श्रीमंत भाऊसाहेबासमागमें मुत्सदी राजश्री बळवंतराव गणपत व नाना पुरंदरे व महीपतराव चिटणीस ऐसे येत आहेत. थोरले श्रीमंतापाशी राजश्री सखारामपंत व कृष्णराव पारसनीस ऐसे राहिले. वडिलांस कळावें. मित्ती. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना. पै॥ मिती वैशाख शु॥४ [१७०] ॥ श्री॥ २९ मार्च १७६०. अखंडित लक्ष्मी अलंकृत जनार्दन आपाजी गोसावी यास:सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ इहिदेसीतनमयावअल्लफ. खेडास आले. तेथें शुक्रवारी राहिले व शनवारी कुच करून गेले. तेव्हां चंद्र, तीथ, व जंत्री ही तिन्ही बराबर असून मूळ पत्रांतच थोडीशी संदिग्धता आहे. एकादशीस शिंदखेडास आले व त्रयोदशीस रवानगी झाली असें लिहिल्यामुळे रवानगीचा दिवस तोच मुहुर्ताने निघण्याचा दिवस असा वाचकाचा तर्क होतो. २५७ ग्रांटडफ २०००० घोडेस्वार व १०००० पायदळ निघतांना भाऊंबराबर होते ह्मणून ह्मणतो. एतिहासिक लेखसंग्रह नं. १४४ त २५००० फौज भाऊबराबर गेली ह्मणून लिहिले आहे. २५८ सितैन मया व अलफ असें पाहिजे. सरकारीपत्रांत साल चुकावें हैं आश्चर्य आहे. गोविंदपंतांनी अजूनहि हिशेब दिले नव्हते.