पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/396

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पत्रे पाठविली ती फाल्गुन वद्य चतुर्दशीस मुक्काम मजकुरी पावली. सविस्तर वर्तमान कळले. श्रीमंतांस पत्रे होती ती दिली. पत्रे पाहून बहुत संतोषी जाले. अबदालीची हिंमत बहुत दिसोन येत होती. परंतु त्याणे अवसान राकिलें. हे आयकोन बहुत समाधान पावले. देशीचें वर्तमान तरी श्रीमंत नानासाहेबांच्या व श्रीमंत राजेश्री भाऊसाहेबांच्या भेटी पडदुरचे मुक्कामी फाल्गुन वद्य पंचमीस होऊन पांच सात मुकाम तेथे झाले. तदोत्तर फाल्गुन वद्य एकादशीस मुक्काम मजकुरास आले. तेथून श्रीमंत राजश्री भाऊसाहेबाची रवानगी फोल्गुन वद्य त्रयोदशीस जाली. डेरादाखल जाले. लोकांचा टाकतो असें गोविंदपंताला वाटले. परंतु, शिमगी पौर्णिमेच्या दिवशी, १७६० च्या मार्चच्या चवथ्या पांचव्या तारखेस शटियाजी खराडे व आनंदराव यादव ह्यांना जेव्हां त्याने कापून काढिले असें गोविंदपंतानें ऐकिलें असेल, तेव्हां अबदालीने अवसान टाकिले की काय ते त्याला चांगलेच कळले असेल! २५६ मोडकांच्या जंत्रीत फाल्गुन वद्य त्रयोदशीला छ २६ रजब येतो. लेखांक १६७ त पंचवीस रज्जबीं हिंदुस्थानास जावयास निघालों ह्मणून भाऊसाहेब स्वतः लिहितात. बाबूराव ह्या व मागील पत्रांत फाल्गुन वद्य त्रयोदशीला ह्मणजे मोडकांच्या जंत्रीप्रमाणे २६ रज्जबाला भाऊसाहेब निघाले ह्मणून लिहितो. तेव्हां ह्या चंद्राचा व तिथीचा मेळ कसा बसणार? चंद्र २५ ला भाऊ निघाले हे खास आहे. मूळ पत्रांत पंचविसाचा आंकडा आहे ह्याची आमांला पूर्ण खात्री आहे. वद्य त्रयोदशीला निघाले ह्मणून बाबूराव दोनदां लिहितो. तेव्हां चंद्रांत, तिथींत, जंत्रीत किंवा दोन्ही पत्रांत कोठे तरी चूक आहे हे उघड आहे. ही चुकी शोधून काढण्यास चंद्राचा नीट तपास करूं. पंचवीस चंद्र शुक्रवारी आहे. परंतु, मुसलमानांचे वार रात्री सुरू होतात. तेव्हां पंचवीस चंद्र हिंदूंच्या गुरुवारी संध्याकाळी सुरू होऊन हिंदूच्या शुक्रवारी संध्याकाळाला संपतो. हिंदूंच्या गुरुवारी संध्याकाळी एकादशी आहे व शुक्रवारी दिवसा १२ द्वादशी आहे. एकादशीस पडदुराहून शिंदखेडाला भाऊ गेले असें बाबूराव लिहितो ( लेखांक १६८।१६९). त्या जाण्याच्या वेळी पंचवीस चंद्र असल्यास भाऊसाहेब एकादशीच्या रात्रौ गेले पाहिजेत हे निर्विवाद आहे. भाऊसाहेबाच्या बखरी ( पृष्ठ ८९) तहि " भाऊसाहेब शिवालिखिताच्या महर्ते रात्री बाहेर पडले" ह्मणून लिहिले आहे. तेव्हां भाऊंचा २५ वा चंद्र ह्मणजे बाबूरावाची एकादशी होय हे निश्चित आहे. मुहूर्ताने प्रस्थान ठेवण्याकरिता भाऊ ( हिंदूंच्या ) गुरुवारी संध्याकाळी पडदुराहन शिंद